शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट कापल्यानंतर श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल, पालघरमध्ये खळबळ, पोलिसांकडून शोध सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 11:00 IST

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराज झालेले पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हे मागच्या १५ तासांपासून नॉट रिचेबल झाले आहेत. श्रीनिवास वनगा (Srinivasa Vanaga) यांचे दोन्ही फोन बंद असून, त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराज झालेले पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हे मागच्या १५ तासांपासून नॉट रिचेबल झाले आहेत. श्रीनिवास वनगा यांचे दोन्ही फोन बंद असून, त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. त्यामुळे पालघरमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, बेपत्ता असलेल्या श्रीनिवास वनगा यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड झालं तेव्हा पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हे शिंदे गटात आले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या जवळपास सर्वच आमदारांना शिंदे गटाकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र केवळ श्रीनिवास वनगा यांनाच उमेदवारी नाकारण्यात आली. काल त्यांच्याऐवजी राजेंद्र गावित यांना पालघरमधून उमेदवारी दिल्याचं स्पष्ट होताच श्रीनिवास वनगा यांना मोठा धक्का बसला होता. तसेच ढशाढसा रडत त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली होती. तू मतदारसंघात निवडून येत नाही, तुझ्याबाबतीत नकारात्मक अहवाल आलाय हे कारण देऊन मला मागेही थांबवले, मी प्रामाणिकपणे थांबलो. प्रत्येक वेळी गावितांना तिकिट दिले. जेव्हा जेव्हा चांगली संधी येते, मी चांगले काम केले तरीही मला डावलण्यात आलं असं सांगत आमदार श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले होते.

दरम्यान, श्रीनिवास वनगा हे नाराज झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शिंदे गटाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांसोबत संवाद साधून श्रीनिवास वनगा यांना योग्य तो मान दिला जाईल, असं आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४palghar-acपालघरShiv Senaशिवसेना