शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 08:17 IST

Maharashtra Assembly Election 2024 : पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. पालघर सह संपर्कप्रमुख वैभव संखे आणि उपनेते जगदीश धोडी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भारती कामडी यांचा पक्षप्रवेश पार पडला.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिल्यानंतर आता भारती कामडी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत विष्णू सावरा आणि भारती कामडी यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी हेमंत विष्णू सावरा यांनी भारती कामडी यांचा पराभव केला. भारती कामडी यांना लोकसभा निवडणुकीत चार लाख मत मिळाले होती. मात्र, आता भारती कामडी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

पालघर लोकसभा निवडणुकीत हेमंत सावरा यांना 6 लाख 1 हजार 244 मतं मिळाली होती. तर कामडी यांना 4 लाख 17 हजार 938 मतं मिळवली होती. दोन्ही उमेदवारांमध्ये 1 लाख 83 हजार 306 मतांचा फरक होता. तर तिसऱ्या क्रमांकाच्या बहुजन विकास आघाडी या हितेंद्र ठाकूर यांच्या राजेश पाटील या उमेदवारानं 2 लाख 54 हजार 517 मते मिळवली होती. 

दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्वंच कार्यकर्त्यांचा ओढा होता. मात्र, भारती कामडी या 'मातोश्री'शी एकनिष्ठ राहिल्या. त्याचेच फळ म्हणून त्यांना लोकसभेच्यावेळी उमेदवारी ठाकरे गटाकडून मिळाली. मात्र, आता त्यांनाही ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पालघरमध्ये राजकीय घडामोडींचा वेग आला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४palghar-acपालघरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेpalgharपालघर