शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

पाटणमध्ये तिरंगी लढतीमुळे रंगत, हर्षद कदम यांच्यामुळे देसाई अडचणीत, पाटणकर गट तयारीत

By दीपक शिंदे | Updated: November 7, 2024 06:47 IST

Maharashtra Assembly Election 2024: पाटण विधानसभा मतदारसंघात शंभूराज देसाई यांच्या विरोधात उद्धवसेनेने हर्षद कदम यांना उमेदवारी दिलेली आहे तर शरद पवार गटाचे सत्यजित पाटणकर यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

- दीपक शिंदे सातारा -  पाटण विधानसभा मतदारसंघात शंभूराज देसाई यांच्या विरोधात उद्धवसेनेने हर्षद कदम यांना उमेदवारी दिलेली आहे तर शरद पवार गटाचे सत्यजित पाटणकर यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे याठिकाणी तिरंगी लढत होणार असल्याने शंभूराज देसाई यांच्या अडचणी वाढल्या आहेत.  पाटण मतदारसंघात देसाई आणि  पाटणकर हे दोन गट मजबूत आहेत. 

शंभूराज देसाई यांनी पक्ष वाढविण्याऐवजी आपला गट वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मूळ शिवसैनिक हे शंभूराज देसाई यांच्यावर नाराज आहेत. ते हर्षद कदम यांना मदत करतील. यामुळे यावेळीची विधानसभा निवडणूक ही देसाई यांना अधिक जड जाण्याची शक्यता राजकीय अभ्यासक व्यक्त करीत आहेत. पाटणकर यांना आता नवीन चिन्ह घेऊन लोकांमध्ये जायचे असल्याने ते किती मतदारांपर्यंत पोहचतात हे महत्वाचे ठरणार आहे.

पाच वर्षांत काय घडले अन् बिघडले- मागील पाच वर्षात शंभूराज देसाई यांनी पाटणकर यांच्याकडील बऱ्याचशा ग्रामपंचायती ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही निवडणूक त्यांना सोपी जाईल असे त्यांना वाटत आहे.- सत्यजित पाटणकर यांनी देखील आपला जुना गट पुन्हा सक्रिय केला आहे.-  शरद पवार यांनी हा मतदारसंघ उद्धव सेनेला सोडल्यामुळे शिवसेनेच्या मतांमध्ये विभागणी 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे‘शंभूराज देसाई यांनी मूळ शिवसेना पक्ष सोडून ते शिंदेसेनेत गेल्याचे शिवसैनिकांना रुचलेले नाही.पाटणमधील विकासाचा दावा मात्र, अनेक विकासकामे अर्धवटच आहेत.  कोयना धरणग्रस्त नागरिकांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत.बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेले सत्यजित पाटणकर यांचा मतदारसंघात जनसंपर्क कमी. 

लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय ?- लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शशिकांत शिंदे यांना अधिक मते मिळाली. - खासदार उदयनराजे भोसले यांना ७५ हजार ४६० तर शशिकांत शिंदे यांना ७८ हजार ४०३ मते मिळाली होती. लोकसभेला उदयनराजेंबद्दल सुरुवातीच्या टप्प्यात असहकाराची भूमिका होती. नंतर त्यामध्ये बदल झाला. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४patan-acपाटणShambhuraj Desaiशंभूराज देसाईMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी