शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 08:32 IST

Maharashtra Assembly Election 2024 : पहिल्या यादीत स्थान न मिळालेल्या आमदार संदीप क्षीरसागर यांना त्यांच्या बीड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून शनिवारी, दि. २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत माजी मंत्री सतीश पाटील (एरंडोल) यांच्यासह माजी आमदार राहुल मोटे (परांडा), पांडुरंग बरोरा (शहापूर), दीपिका चव्हाण (बागलाण) यांना संधी देण्यात आली आहे.अजित पवार गटातून आलेल्या सतीश चव्हाण यांना (गंगापूर) आणि दीपक चव्हाण यांना (फलटण) उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत स्थान न मिळालेल्या आमदार संदीप क्षीरसागर यांना त्यांच्या बीड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अजित पवार गटासोबत गेलेल्यांविरोधात शड्डू- राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधात शरद पवार गटाकडून प्रामुख्याने उमेदवार देण्यात आले आहेत. - येवल्यातून मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात माणिकराव शिंदे, दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात सुनीता चारोस्कर, तर सिन्नर मतदारसंघात माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात उदय सांगळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. - जुन्नरमध्ये अतुल बेनके यांच्या विरोधात विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, अकोलेमध्ये किरण लहामटे यांच्याविरोधात अमित भांगरे, अहिल्यानगर शहरमध्ये संग्राम जगताप यांच्याविरोधात माजी महापौर अभिषेक कळमकर, चंदगडमध्ये राजेश पाटील यांच्याविरोधात बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या नंदिनी भाबुळकर कुपेकर यांना उमेदवारी मिळाली. तसेच उत्तमराव जानकर यांना माळशिरसमधून उमेदवारी मिळाली.

मोटे यांच्या उमेदवारीमुळे मविआत वादाची शक्यता? शरद पवार गटाकडून दुसऱ्या यादीत परांडा मतदारसंघातून माजी आमदार राहुल मोटे यांची उमेदवारी जाहीर केली आहे; परंतु या जागेवर उद्धवसेनेकडून दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव रणजित पाटील यांची उमेदवारी याआधीच जाहीर केली आहे. त्यामुळे परांडा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत पुन्हा वादाची शक्यता आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारSandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागरNCPराष्ट्रवादी काँग्रेस