शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 14:28 IST

Maharashtra Assembly Election 2024 : सदाभाऊ खोत यांची जीभ पुन्हा घसरली. त्यांनी संजय राऊत यांची तुलना डुकराशी केली आहे.  

Maharashtra Assembly Election 2024 :  मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. दरम्यान, महायुतीतील नेते सदाभाऊ खोत यांनी काल शरद पवार यांचं आजारपण आणि शारिरिक व्यंगावर टीका केली. त्यामुळे राजकीय वातावरण तापले. शरद पवार यांच्यावरील टीकेनंतर वाद निर्माण झाला. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली.

शरद पवारांवरील टीकेवरून सुरू झालेला वाद थांबला नसतानाच सदाभाऊ खोत यांनी पुन्हा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर अभद्र शब्दात टीका केली आहे. २४ तासात दोन वादग्रस्त विधानं केल्यामुळे सदाभाऊ खोत आता पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर बोलताना ‘देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा’ असा उल्लेख केला. त्यालाही उत्तर देताना सदाभाऊ खोत यांची जीभ पुन्हा घसरली. त्यांनी संजय राऊत यांची तुलना डुकराशी केली आहे.  

सदाभाऊ खोत म्हणाले की, संजय राऊत यांना गावगाडा माहिती नाही. शेतकऱ्याचा राखणदार कुत्रा याचा मागमूस असायचा पताच नाही. त्यांना इतकंच सांगेन की कुत्रा हा इमाने इतबारे त्याच्या धन्याची राखण करत असतं. ते खाल्लेल्या अन्नाला जागत असतं. तसंच, आम्ही आमच्या धन्याची इमाने इतबारे आमच्या धन्याची राखण करत आहोत, याचा सार्थ अभिमान आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, २०१४ मध्ये मोदींचा फोटो गळ्यात अडकवून मतांचा जोगवा मागत गावोगावी हिंडत होता. २०१९ मध्येही तुम्ही भाषणं करत होता. सत्तेत येताच पहिला खंजीर हातात घेतला. तुमच्यात इमानदारपणा आहे का शोधा, कुत्र्याएवढा जरी तुमच्यात इमानदारपणा असता तरीसुद्धा महाराष्ट्रानं कौतुक केलं असतं. परंतु मला त्यांच्यावर जास्त बोलावं असं वाटत नाही. कारण, डुकराला कितीही साबण, शाम्पू लावला तरी डुक्कर गटारातच जात असतं, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. आता या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sadabhau Khotसदाभाउ खोत Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारBJPभाजपाPoliticsराजकारण