शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 19:08 IST

Eknath Shinde: जून २०२२ एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्ष असे ५० आमदार होते. उद्धव ठाकरेंचे सरकार शिंदेंनी भाजपच्या साथीने उलथविले होते.

महाराष्ट्रात उद्या मतमोजणी होणार आहे. कोणाचे सरकार येईल, मुख्यमंत्री कोण? याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. अशातच सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील बंडानंतर त्यांनीच दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली आहे. सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही असे म्हणत अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांना राजकारण सोडेन या शब्दाची आठवण करून दिली आहे. 

जून २०२२ एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्ष असे ५० आमदार होते. उद्धव ठाकरेंचे सरकार शिंदेंनी भाजपच्या साथीने उलथविले होते. शपथविधी झाल्यानंतर मुंबईतील शक्तीप्रदर्शन सभेत शिंदेंनी आपल्यासोबत आलेले ५० आमदार पुन्हा निवडून आले नाहीत तर मी राजकारण सोडून निघून जाईन असे भर सभेत वक्तव्य केले होते. याची आठवण ठाकरे गटाच्या नेत्या अंधारे यांनी आज केली आहे. 

शिंदे काय म्हणालेले...माझ्यासोबत जे ५० आमदार आहेत त्यांचे टेन्शन होते. त्यांचे वाईट होऊ नये. यांच्यापैकी एकही पडणार नाही. एक माणूस जरी पडला तरी मी राजकारण सोडून निघून जाईन, सगळ्यांना २०२४ च्या निवडणुकीत निवडून आणणारच, असे शिंदे म्हणाले होते. महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा मीच मुख्यमंत्री होणार होतो. पण पक्षातील काही नेत्यांनी खोडा घातला, असे म्हणताना शिंदे यांनी कोणाचे नाव घेतले नाही. तुम्हालाच मुख्यमंत्री करणार होते, पण तुमच्या पक्षातून विरोध झाला, आमचा विरोध नव्हता असे नंतर एकदा मला अजित पवार यांनी सांगितले. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे सांगितले असे म्हणत शिंदे यांनी पवार यांच्याकडेही बोट दाखविले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSushma Andhareसुषमा अंधारेShiv Senaशिवसेनाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४