शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

"तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, शिंदेंना मी आधीच सांगितलं होतं’’, या नेत्यानं केला दावा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 17:54 IST

Maharashtra Assembly Election 2024 Result: मुख्यमंत्रिपद नसेल तर सरकारमध्ये सन्मानजनक वाटा मिळावा, गृहमंत्रिपद शिंदे गटाकडे द्यावे, अशा मागण्या करत एकनाथ शिंदे यांनी ताठर भूमिका घेतली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या मार्गात तिढा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत बंडावेळी एकनाथ शिंदे यांना साथ देणारे माजी आमदार बच्चू कडू यांनी एक सूचक विधान केलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालात निर्विवाद बहुमत मिळवल्यानंतर आठवडा उलटला तरीही महायुतीला नव्या सरकारमधील मुख्यमंत्र्यांची निवड करून सरकार स्थापन करता आलेलं नाही. या निवडणुकीत १३२ जागा जिंकत बहुमताजवळ मजल मारल्याने भाजपाने मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकला आहे. त्यामुळे मागची अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदे यांची निराशा झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपद नसेल तर सरकारमध्ये सन्मानजनक वाटा मिळावा, गृहमंत्रिपद शिंदे गटाकडे द्यावे, अशा मागण्या करत एकनाथ शिंदे यांनी ताठर भूमिका घेतली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या मार्गात तिढा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत बंडावेळी एकनाथ शिंदे यांना साथ देणारे माजी आमदार बच्चू कडू यांनी एक सूचक विधान केलं आहे. पुढे तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, असं मी एकनाथ शिंदे यांना आधीच सांगितलं होतं, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. 

एकनाथ शिंदे यांना भाजपाने पुन्हा मुख्यमंत्रिपद देण्यास दिलेला नकार आणि सत्तास्थापनेत शिवसेना शिंदे गटाला समाधानकारक वाटा मिळण्याची कमी झालेली शक्यता, याबाबत प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की, मी एकनाथ शिंदे यांना बऱ्याचदा सांगत होतो की, तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल. रात्री दोन वाजताही सर्वसामान्यांना भेटणारा मुख्यमंत्री मी एकनाथ शिंदे यांच्या रूपात पाहत होतो. त्यामुळे शिंदे यांना आपण दाबून ठेवलं पाहिजे असं भाजपाला वाटत होतं. एकनाथ शिंदे यांचं काम बोलत होतं, त्यामुळे सत्तेत असताना ते त्यांना दाबू शकले नाहीत. भाजपाला एकहाती सत्ता घ्यायचीच आहे, त्यामुळे आता  एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होणारच होता, असा दावा बच्चू कडू यांनी केला. 

दरम्यान, महायुतीच्या सत्तास्थापनेबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. तसेच वेगवेगळे फॉर्म्युलेही समोर येत आहेत. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला असला तरी गृहमंत्रिपदासाठी शिंदे गट हा आग्रही असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद न स्वीकारता सरकारबाहेर राहतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुतीBacchu Kaduबच्चू कडू