शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

"हा महायुतीच्या एकजुटीचा विजय, जनतेसमोर नतमस्तक", देेवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 15:48 IST

Maharashtra Assembly Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आज लागलेल्या निकालांमध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये महायुती २२९ जागांवर आघाडीवर आहे. त्यामध्ये भाजपाला तब्बल १३३ जागांवर आघाडी मिळाली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आज लागलेल्या निकालांमध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये महायुती २२९ जागांवर आघाडीवर आहे. त्यामध्ये भाजपाला तब्बल १३३ जागांवर आघाडी मिळाली आहे. दरम्यान, या विजयानंतर भाजपाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावूक प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा विजय राष्ट्रीय विचारांच्या संघटनांचा विजय आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याविरोधात जनजागृती करणारे विविध पंथांचे जे आमचे संत आहेत. त्यांचाही हा विजय आहे. अशा सगळ्यांचा हा विजय आहे. वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन ज्यांनी ही जनजागृती केली, त्यांचा हा विजय आहे. तसेच खऱ्या अर्थाने आमचे महायुतीचे जे लाखो कार्यकर्ते आहेत. त्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रामदासजी आठवले. आमचे सगळे मित्रपक्ष या सगळ्यांचा हा विजय आहे. या सर्वांच्या प्रयत्नामुळे हा प्रचंड मोठा विजय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

या विजयाच्या निमित्ताने मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही अभिनंदन करतो. त्यांनी महाराष्ट्रात येऊन आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उर्जा भरली. आमच्या सगळ्या राष्ट्रीय नेतृत्वाने आम्हाला मार्गदर्शन केलं. तसेच आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आमच्या विजयात हातभार लावला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत. याच्यापेक्षा जास्त आज इथे काही बोलताच येत नाही. ज्या महाराष्ट्राच्या जनतेनं हे प्रेम दिलं आहे, तिला मी साष्टांग दंडवत घालतो. महाराष्ट्रात जो काही विषारी प्रचार झाला होता. त्याला महाराष्ट्राच्या जनतेनं आपल्या कृतीमधून उत्तर दिलं आहे, असे भावूक उदगार देवेंद्र फडणवीस यांनी काढले. 

मी म्हणालो होतो की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. आम्ही चक्रव्युह तोडून दाखवू, तो चक्रव्युह तुटलेला आहे. तसेच महाराष्ट्र हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024MahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४