शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दमदार विजयानंतरदेखील भाजपचा ‘दक्ष’ पवित्रा, राष्ट्रीय सरचिटणीसांनी घेतला आढावा

By योगेश पांडे | Updated: December 16, 2024 23:48 IST

Maharashtra Assembly Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीत बंपर विजयानंतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात नियोजनाला सुरुवात झाली असून, विधानसभेच्या विजयानंतर पदाधिकारी व कार्यकर्ते ‘रिलॅक्स’ होऊ नयेत याची खबरदारी घेण्यात येत आहे.

- योगेश पांडे नागपूर - विधानसभा निवडणुकीत बंपर विजयानंतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात नियोजनाला सुरुवात झाली असून, विधानसभेच्या विजयानंतर पदाधिकारी व कार्यकर्ते ‘रिलॅक्स’ होऊ नयेत याची खबरदारी घेण्यात येत आहे. राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष व सहसंघठनमंत्री शिवप्रकाश यांनी भाजपच्या विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात त्यांनी निकालांतील एकूण कामगिरीचा आढावा घेतला व महायुतीचा धर्म न पाळता मित्रपक्षांसाठी काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे कठोर शब्दांत कान टोचले.

विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे राजकारण आणि तेथील मुद्दे वेगळे राहणार आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांचा तळागाळात ‘कनेक्ट’ कायम असणे आवश्यक आहे. जी चूक २०२४च्या लोकसभा निवडणुकीअगोदर झाली ती परत होऊ नये यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. याअंतर्गतच बी. एल. संतोष व शिवप्रकाश यांनी नागपुरात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष, महामंत्री व प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. भाजपच्या शहर कार्यालयात झालेल्या या बैठकीत दोन्ही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघनिहाय निकालातील जमेच्या बाजू व कच्चे दुवे अगोदर पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी जेथे भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला किंवा अपेक्षेप्रमाणे मताधिक्य मिळू शकले नाही, अशा जागांचे गणित जाणून घेतले, तर सर्वात शेवटी महायुतीच्या इतर मित्रपक्षांचे उमेदवार उभे असलेल्या मतदारसंघांत भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे विश्लेषण केले. यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मतदारयादीपासून पक्षाच्या सर्व उपक्रमांसाठी परत नव्या जोमाने कामाला लागण्याची सूचना केली. तसेच तळागाळात फिरून जनतेच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत व खरोखर योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्याचे निर्देशच दिले.

काम का केले नाही ते सांगा?बैठकीदरम्यान काही जिल्हाध्यक्ष व महामंत्र्यांनी थातूरमातून कारणे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र बी. एल. संतोष व शिवप्रकाश हे दोघेही प्रत्येक मतदारसंघाचा विस्तृत अहवालच सोबत घेऊन आले होते. निवडणूक लढण्याअगोदर तिकिटासाठी अनेक जण प्रयत्नरत होते. मात्र संबंधित जागा मित्रपक्षांना गेल्यावर किंवा वेगळा उमेदवार दिल्यावर त्याच जोमाने काम का केले नाही या शब्दांतच काही जणांना विचारणा केली. जेथे पराभव झाला तेथे महायुतीसाठी काम का केले नाही हा प्रश्न विचारताना त्यांनी तेथील मतांची बेरीज वजाबाकीदेखील मांडली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाmaharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024