शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांच्यासमोर राजू शिंदे यांचे पुन्हा आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 09:31 IST

Maharashtra Assembly Election 2024: शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा शिंदेसेना विरूद्ध उद्धवसेना असा सामना होत आहे. चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या आ. संजय शिरसाट यांच्याविरोधात राजू शिंदे यांना उभे करून उद्धवसेनेने आव्हान दिले आहे.

- बापू सोळुंकेछत्रपती संभाजीनगर: शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा शिंदेसेना विरूद्ध उद्धवसेना असा सामना होत आहे. चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या आ. संजय शिरसाट यांच्याविरोधात राजू शिंदे यांना उभे करून उद्धवसेनेने आव्हान दिले आहे.

मागील तीन टर्म संजय शिरसाट या मतदारसंघात जिंकत आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत येथे थेट दुरंगी लढत होत आहे. गेल्यावेळी भाजपचे बंडखोर आणि  अपक्ष असलेले राजू शिंदे यांना यंदा उद्धवसेनेने मैदानात उतरविले आहे.  शिंदेसेनेने शिरसाट यांनाच पुन्हा रिंगणात उतरविले आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आ. शिरसाट हे अग्रभागी असतात. यामुळे उद्धवसेनेतील नेत्यांच्या ते हिटलिस्टवर  आहेत. कामाच्या जोरावर आपण लढत असल्याचे शिरसाट सांगतात. दुसरीकडे मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादीने येथे उमेदवार दिला नाही आणि बंडखोरीही होऊ दिली नाही. याचा लाभ शिंदे यांना कितपत होईल, हे निकालानंतरच दिसेल.

निवडणुकीतील कळीचे मुद्देमागील अडीच वर्षांच्या कालावधीत मतदारसंघात केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामाच्या मुद्द्यावर संजय शिरसाट निवडणूक लढवित आहेत.शिरसाट हे अनिवासी छत्रपती संभाजीनगरकर असल्याचा मुद्दा उद्धवसेना उपस्थित करीत आहेत. ते व्हिजिटींग आमदार म्हणून केवळ शनिवार, रविवार शहरात येतात आणि उर्वरित दिवस मुंबईत राहतात, असा आरोप आहे.शिरसाट यांच्या प्रचारातून भाजपने अंग काढून घेतल्याचे चित्र आहे. दुसरीकडे उद्धवसेनेच्या राजू शिंदे यांना महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांचे भक्कम पाठबळ मिळत आहे.२०१९ मध्ये तिसऱ्या स्थानी असलेल्या ‘एमआयएम’ चा यंदा उमेदवार नाही. त्यामुळे मुस्लीम मतदार महाविकास आघाडीकडे वळतील का, हा मुद्दाही कळीचा आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Shirsatसंजय शिरसाटShiv Senaशिवसेनाaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिम