शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसने जाहीरपणे बाळासाहेब ठाकरेंचे कौतुक करुन दाखवावं"; पंतप्रधान मोदींचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 16:36 IST

PM Narendra Modi : काँग्रेसने वीर सावरकर यांचा सतत अवमान केल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं.

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. धुळ्यात पहिली सभा घेतल्यानंतर नाशिक येथे पंतप्रधान मोदींनी सभा घेतली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस विकासात राज्याच्या अडचण निर्माण करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंचे कौतुक करुन दाखवावं, असं आव्हान देखील पंतप्रधान मोदींनी दिलं आहे. आम्ही दिवस मोजत आहोत असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

"जाती जातीत भांडणे लावून सत्ता काबीज करणे हे काँग्रेसचे षडयंत्र आहे. मात्र आता काँग्रेसचे झुट की दुकान महाराष्ट्रात चालणार नाही. काँग्रेस प्रत्येक जातीत फुट पाडण्याचे काम करीत असून ओबीसी समाजावर सतत अन्याय करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. एक हैं तो सेफ हैं हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. एक ओबीसी पंतप्रधान झाला हे काँग्रेसला सहन होत नसून त्याचा राग काँग्रेस ओबीसी समाजावर अन्याय करून काढत आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले. "राज्यातील महायुती सरकारने घेतलेले क्रांतिकारी निर्णय राज्याला नवी दिशा देत असून माझी लाडकी बहिण योजनेमुळे महिलांना न्याय मिळालाय. ही योजना सुरू ठेवायची आहे त्यामुळे महायुती सरकारच पुढे ही योजना राबवू शकेल. दुसरीकडे महाविकास आघाडी केवळ भुल थापा मारून वेळ मारून नेतेय. महिला महाविकास आघाडीच्या या कृत्याला माफ करणार नाहीत. आम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मात्र त्यांना ही गरज वाटली नाही. त्यांनी कायम याकडे दुर्लक्ष केले. आता मात्र त्यांना या निर्णयाचा त्रास होतो आहे," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

"महाराष्ट्राच्या नावावर राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीचा हा खरा चेहरा आहे. महायुतीचा जाहीरनामा सर्व घटकाना न्याय देणारा आहे. महाविकास आघाडीचा जाहीरनामा एक घोटाळापत्र असून युतीचा जाहीरनामा विकासपत्र आहे. आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर ते लाडकी बहीण योजना बंद करतील. आम्ही आमच्या कामाचा हिशेब जनतेस देत आहोत. आघाडी सरकार मात्र खोटे बोलून लोकांना फसवत आहे. हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलणांना येथे काँग्रेसने हेच काम केले पण नंतर सर्व घोषणा फेल गेल्या. मात्र प्रत्येक गरीबास पक्के घर देण्याचे काम आम्ही करत असून येथे जमलेल्या प्रत्येकाने गरिबांसाठी काम करावे," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

"वीर सावरकर आमचे  प्रेरणास्तोत आहे. काँग्रेसने सावरकर यांचा सतत अवमान केला आहे. मात्र राहुल गांधी यांना आघाडीतील नेत्यांनी राज्यात निवडणूक जिंकायची आहे तर सावरकर यांच्याविषयी बोलू नका, असे बजावले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरेंचे योगदान अतुलनीय आहे. पण काँग्रेस नेत्यांच्या तोंडातून बाळासाहेबांच्या कौतुकासाठी एक शब्दही निघत नाही. काँग्रेसला मी आव्हान देतो की त्यांनी आणि त्यांच्या युवराजांनी बाळासाहेब ठाकरेंचे त्यांच्या विचारधारेचे सार्वजनिकरित्या कौतुक करुन दाखवावे. आज ८ नोव्हेंबर आहे. मी दिवस मोजायला सुरुवात करतो आणि महाविकास आघाडीकडून उत्तराची वाट बघतो. त्यांनी सावरकरांचे आणि बाळासाहेबांचे कौतुक करुन दाखवावं. महाराष्ट्र सुद्धा पाहिल. आम्ही दिवस मोजू आणि तुम्हीसुद्धा मोजा," असं आव्हान पंतप्रधान मोदींनी दिले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे