शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीला शिंदे-ठाकरे गटाचे उमेदवार एकत्र, सोबत केली विठुरायाची आरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 13:54 IST

Maharashtra Assembly Election 2024:

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये अटीतटीची लढत रंगणार आहे. येथे शिंदे गटाकडून विद्यमान आमदार दीपक केसरकर हे रिंगणात आहेत. दरम्यान, आज सकाळी सावंतवाडीकरांना एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले दीपक केसरकर आणि राजन तेली हे आज सावंतवाडीमधील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात एकत्र आले. तसेच दोघांनीही एकत्रितपणे विठ्ठल-रखुमाईची आरती केली. 

सावंतवाडीमध्ये महायुतीकडून दीपक केसरकर यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित झाल्यानंतर  राजन तेली यांनी भाजपाला रामराम ठोकत ठाकरे गटाचं शिवबंधन हाती बांधलं होतं. तसेच त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारीही जाहीर झाली होती. त्यातच मागच्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर सातत्याने बोचरी टीका केली जात आहे. त्यामुळे निवडणुकीतील एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले दीपक केसरकर आणि राजन तेली हे दिवाळीनिमित्त आरतीसाठी विठ्ठल मंदिरात एकत्र आल्याने सावंवाडीकरही अवाक् झाले. आता विठुमाऊलीकडून मतांसाठीचा आशीर्वाद कुणाला मिळणार, याचीच चर्चा सुरू आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदासंघातून दीपक केसरकर यांनी सलग तीन वेळा विजय मिळवलेला आहे. तसेच आता ते येथून चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, राजन तेली यांनी याआधी दोन वेळा सावंतवाडीमधून निवडणूक लढवली होती. तसेच त्यांना दोन वेळा पराभवाचा धक्का बसला होता. दरम्यान, महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन तेली यांच्यासमोर भाजपाचे बंडखोर विशाल परब आणि शरद पवार गटाच्या बंडखोर अर्चना घारे परब यांचे आव्हान आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sawantwadi-acसावंतवाडीDeepak Kesarkarदीपक केसरकर Rajan Teliराजन तेली MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीDiwaliदिवाळी 2024