शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

माजी मुख्यमंत्र्यांच्या पुढच्या पिढ्या देखील निवडणूक रिंगणात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 09:39 IST

Maharashtra Assembly Election 2024 : पिता-पुत्रास, काका-पुतण्यास मिळाली मुख्यमंत्रिपदाची संधी; काहींच्या वारसांनी निवडल्या स्वतःच्या वेगळ्या वाटा

- मंदार पारकर मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्यांच्या पुढच्या पिढ्यादेखील विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. यातील काहीजण आधीही आमदार राहिले आहेत, तर काही पहिल्यांदाच नशीब आजमावत आहेत. यात विशेष म्हणजे अमित देशमुख - धीरज देशमुख आणि नीलेश आणि नितेश राणे या दोन सख्ख्या भावांच्या जोड्या निवडणूक रिंगणात आहेत. महाराष्ट्राला मोठ्या राजकीय घराण्यांची परंपरा तर आहेच, परंतु त्यांच्यातील सदस्यांसोबत आता माजी मुख्यमंत्री राहिलेल्यांच्या पुढच्या पिढ्याही राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. यंदाच्या निवडणुकीत हेच चित्र कायम आहे.

सख्खे भाऊ यंदा रिंगणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख हे लातूर शहरमधून चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांचेच धाकटे बंधू धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून दुसऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत. माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र व माजी खासदार नीलेश राणे आता कुडाळचे शिंदेसेनेचे उमेदवार आहेत. त्यांचे धाकटे बंधू नितेश हे कणकवलीमधून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. 

आधी वडील, मग मुलगाही सीएम महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा मान शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण या पिता-पुत्रांना मिळाला आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया यंदा भोकर मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवत आहे. 

मुलगी, जावईदेखील वारसदार माजी मुख्यमंत्री दिवंगत बाबासाहेब भोसले यांच्या कन्या सरोज भोसले या मुंबईत विधानसभा निवडणूक लढल्या. पण, पराभूत झाल्या होत्या. माजी मुख्यमंत्री दिवंगत अब्दुल रहमान अंतुले यांचे जावई मुश्ताक अंतुले हे राज्यमंत्री राहिले. आता ते अजित पवार गटात आहेत. 

मुलगा, पुतण्या अन् नातूही nशिवाजीराव पाटील - निलंगेकर यांचे नातू संभाजी पाटील - निलंगेकर हे निलंगा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. nमाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरेदेखील दुसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. वरळी मतदारसंघातून ते लढत आहेत. nमाजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून उभे आहेत, तर नातू रोहित पवार कर्जत- जामखेडमध्ये लढत आहेत. दुसरे नातू युगेंद्र हे अजित पवारांविरोधात लढत आहेत. 

नाईक घराण्यात दोनदा मुख्यमंत्रिपद  वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक या काका-पुतण्यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले. वसंतरावांचे नातू इंद्रनील नाईक हे परंपरागत मतदारसंघ पुसदचे विद्यमान आमदार असून, ते अजित पवार गटाकडून लढत आहेत. त्यांचे सख्खे भाऊ ययाती त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून लढू शकतात.वसंतरावांचे पुत्र अविनाश नाईक हे विधान परिषदेचे सदस्य व राज्यमंत्री राहिले. पण पुढे ते उद्योग व्यवसायात रमले. नातू नीलय हे जिल्हा परिषद अध्यक्ष, विधान परिषद सदस्य होते आणि भाजपमध्ये सक्रिय आहेत. सुधाकर नाईक यांचे बंधू मनोहर नाईक हे दीर्घकाळ आमदार व मंत्री होते. 

काहींचे वारस झाले खासदारमाजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून खासदार झाल्या. त्याआधी त्या आमदार राहिल्या आहेत. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पुत्र प्रकाशबापू पाटील हे सांगलीचे दीर्घकाळ खासदार होते. वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील हेही सांगलीचे खासदार राहिले व केंद्रात राज्यमंत्री होते. वसंतदादांचे दुसरे नातू विशाल पाटील नुकतेच लोकसभेवर निवडून गेले आहेत.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचे पुत्र दिल्लीत उद्योजक आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष हे राजकारणात सक्रीय होण्याऐवजी व्यवसायात रमले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४