शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
4
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
5
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
6
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
7
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
8
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
9
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
10
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
11
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
12
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
13
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
14
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
15
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
16
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
17
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
18
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
19
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
20
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

पुढील मुख्यमंत्री भाजपाचा, राज ठाकरेंच्या विधानावर CM एकनाथ शिंदे काय म्हणाले..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 13:33 IST

महायुतीत काही संघर्ष नाही, विसंवाद नाही. मी देवेंद्र फडणवीस, अजितदादा कालही बैठकीत बसलो होतो. समन्वयाने आम्ही ही निवडणूक लढवतोय असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं. 

ठाणे- विरोधक बिथरलेले आहेत. सूडाने पेटलेले आहेत ते राज्याचे भले काय करणार...विरोधक दुश्मनीची भाषा वापरतायेत असा हल्लाबोल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त शिंदेंनी ठाण्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. 

एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधकांकडे फक्त २-३ शब्द आहेत, बाकी काही नाही. माझे हे चोरले, ते चोरले, लहान मुलासारखं माझी बाहुली चोरली, लोकांसाठी काय काम करणार ते सांगा, या राज्यासाठी तुमचं व्हिजन सांगा. मला काय मिळाले यापेक्षा राज्याला काय दिले, देशाला काय दिले, राज्यातील जनतेला काय मिळेल हे बघणारे आम्ही लोक आहोत. दोन सव्वा दोन वर्षात आम्ही लोकांसाठी काम केले हे जनतेला माहिती आहे. आमचा अजेंडा विकासाचा आहे. विकासाच्या दृष्टीने राज्य पुढे नेणार आहेत. कल्याणकारी योजना मजबूत करणे, लाडकी बहिण योजना विरोधक सत्तेत आल्यावर बंद करणार, योजनांची चौकशी करू, आम्हाला जेलमध्ये टाकू असं बोलतायेत. आम्ही तयार आहोत. आमच्या सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना बंद करून पाहणारे सावत्र भाऊ यांना आमच्या लाडक्या बहिणी सरकारमध्ये येऊ देणार नाही. त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही. घरी बसून सरकार चालवता येत नाही, फेसबुक लाईव्ह करून कारभार करता येणार नाही असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला.

तर पुढील मुख्यमंत्री भाजपाचा होणार या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमची महायुती टीमवर्कने चाललीय, महायुतीने केलेले अडीच वर्षाचं काम आणि मविआने केलेले काम यांच्या तुलना होऊन जाऊ द्या, आम्ही समोरासमोर चर्चा करायला तयार आहे. आम्ही रिपोर्ट कार्ड समोर आले. रिपोर्ट कार्ड समोर आणायला धाडस लागते. विरोधकांनी आपलं काम दाखवावे. जनतेच्या दरबारात फैसला होऊन जाऊ द्या. इलाका कुणाचा जरी असला तरी धमाका आम्हीच करणार आहोत. महायुतीने केलेले काम त्याची पोचपावती लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकरी सगळेच आम्हाला देणार आहे. आम्ही केलेल्या कामावर जनता खुश आहे. जे आमच्या विरोधात बोलणारे आज बाजूने बोलू लागले. विरोधात सर्व्हे देणारे आज बाजूने देऊ लागले असं सांगत मुख्यमंत्रि‍पदावर भाष्य करणे टाळले. 

दरम्यान, महायुतीत काही संघर्ष नाही, विसंवाद नाही. मी देवेंद्र फडणवीस, अजितदादा कालही बैठकीत बसलो होतो. समन्वयाने आम्ही ही निवडणूक लढवतोय. एकजुटीने आणि ताकदीने ही निवडणूक लढवतोय. निकालानंतर बहुमत महायुतीला मिळणार.विरोधक बिथरलेले आहेत. सूडाने पेटलेले आहेत ते राज्याचे भले काय करणार...विरोधक दुश्मनीची भाषा वापरतायेत. तुमचे अडीच वर्षाचे सरकार असताना तुम्ही हे करून झालंय, हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना तुम्ही जेलमध्ये टाकले, केंद्रीय मंत्र्‍यांना जेलमध्ये टाकले, पत्रकारांना जेलमध्ये टाकले, साधू हत्याकांड झाले, विरोधकांकडून दुसरी अपेक्षा नाही. विरोधक अहंकारी आहेत, २० तारखेला महाराष्ट्रातील जनता अहंकारी रावणाचं दहन करणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेRaj Thackerayराज ठाकरेMahayutiमहायुतीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी