शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

“आरक्षण कसे देत नाही ते बघूच, सरकारची वाट लावल्याशिवाय शांत बसणार नाही”; मनोज जरांगे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 13:41 IST

Maharashtra Assembly Election 2024 Manoj Jarange Patil News: आमच्या नाकावर टिच्चून ओबीसींच्या काही जाती आरक्षणात घातल्या. पण मराठ्यांना काही आरक्षण दिले नाही, असे सांगत मनोज जरांगे यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले.

Maharashtra Assembly Election 2024 Manoj Jarange Patil News: आमच्या आनंदात विष कालवण्याचे काम केले. आमच्या लेकराच्या काळजावर यांनी आरक्षण न देऊन वार केले. आमच्या हातातोंडाशी आलेला घास होता. सूड भावनेने आमच्या सगळ्या म्हणण्यावर वार केला. देवेंद्र फडणवीस यांना काहीही अधिकार नसताना आमच्या लेकरांच्या त्रास दिला. जाता जाता आम्हाला खुन्नस देऊन आमच्या नाकावर टिच्चून ओबीसींच्या काही जाती आरक्षणात घातल्या. पण मराठ्यांना काही आरक्षण दिले नाही. सरकारची वाट लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. 

मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन रात्री उशिरा मुस्लिम धर्मगुरू तथा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांची  भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल दोन तास झाली चर्चा झाली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सज्जाद नोमानी हे ज्येष्ठ व्यक्ती आहेत. प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक वाटले म्हणून त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांना दोन-तीन दिवसांचा वेळ हवा आहे. दोन-तीन दिवसांत ते काय निर्णय घेणार हे लक्षात येईल. त्यांचे राज्यभरातील धर्मगुरू आहेत. त्यांच्याशी चर्चा करून ते कळवतील, असे मनोज जरांगे यांनी म्हटले होते. 

आरक्षण कसे देत नाही ते बघूच

मराठा आरक्षणाची निवडणुकीबाबत भूमिका काय राहणार याबाबत बैठक असून बैठकीतच निर्णय घेईन. आरक्षण कसे देत नाही ते बघूच. मला आता देणे घेणेच काय कोणाशी? सरकारने आमची घर उन्हात बांधली आहेत. महाविकास आघाडी, महायुती त्यांना सत्तेत बसायचे आहे. त्यांना मारामाऱ्या भांडण लावायचे आहेत. योजना आणायच्या. त्यांच्या या क्रूरपणाचा शेवट मराठे करणार. आमची भूमिका बैठकीत ठरवू, असे मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी अनेक राजकीय तज्ज्ञ, अभ्यासक आणि वकिलांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत आताचे राजकारण तसेच भविष्यातील भूमिका यावर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील लोकसभेप्रमाणे विधानसभेला पाडापाडीच्या राजकाणाची भूमिका घेऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. मराठा फॅक्टरला दलित आणि मुस्लीम समाजाची साथ मिळाल्याचे लोकसभेत दिसून आले. विधानसभेत जरांगे पाटील उभे ठाकले अथवा त्यांनी काही उमेदवारांना पाठिंबा दिला. तर त्यांच्या मागे हे तीनही समाज एकगठ्ठा उभा राहिला, तर राज्यातील चित्र बदलू शकते, असा कयास बांधला जात आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण