शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 23:55 IST

या बैठकीला उद्धव ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि अनिल देसाई, काँग्रेसकडून नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोराट, तर शरदपवार गटाकडून जयंत पाटिल आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात महाविकास अघाडीची (MVA) एक महत्वाची बैठक वांद्रे येथील सोफिटेल हॉटेलमध्ये पार पडली. जवळपास 4 तास चाललेल्या या बैठकीत मुंबई-कोंकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. यात तीनही घटक पक्षांची 120 ते 130 जागांवर सहमती झाली असल्याचे समजते.

या बैठकीला उद्धव ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि अनिल देसाई, काँग्रेसकडून नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोराट, तर शरदपवार गटाकडून जयंत पाटिल आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. महाविकास अघाडीतील नेत्यांनी विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील जागावाटपासंदर्भातील पहिल्या टप्प्याची चर्चा पूर्ण केली आहे.

सूत्रांच्या हवाल्याने आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांनी महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा जागांपैकी 120 ते 130 जागांवर सहमती झाली आहे. याच बरोबर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जो पक्ष ज्या जागेवर निवडून आला, तो पुन्हा त्याच जागेवरून निवडणूक लढवेल. मात्र, पूर्वी जिंकलेल्या साधारणपणे 10 ते 20 टक्के जागांची अदला-बदली होण्याची शक्यता आहे.

एकमत नसलेल्या जागांसंदर्भात महाविकास आघाडीचा प्लॅन -महत्वाचे म्हणजे, एकमत नसलेल्या जागांसंदर्भात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार आणि शिवसेना ठाकरे गट, या तीनही घटक पक्षांच्या सहमतीने एक एजन्सी नेमली जाईल. ही समिती, संबंधित जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार सर्वात प्रबळ आहे, याचा शोध घेईल. याशिवाय पुढील बैठकीत विदर्भातील 62 जागांवर चर्चा होईल आणि लवकरच अंतिम जागावाटपाची चर्चा होईल.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार