शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज

By यदू जोशी | Updated: November 7, 2024 07:05 IST

Maharashtra Assembly Election 2024: लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील अन्य विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने होत असताना उद्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच मोठ्या पक्षांनी मोफत घोषणांचा सपाटा लावला आहे.

- यदु जोशीमुंबई - लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील अन्य विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने होत असताना उद्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच मोठ्या पक्षांनी मोफत घोषणांचा सपाटा लावला आहे. निवडणुकीनंतर या घोषणांची अंमलबजावणी करायची तर राज्यावरील आर्थिक भार  वाढणार आहे. 

महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचार सभांमधून आणि जाहीरनामा प्रसिद्ध करताना मोफत घोषणांचा पाऊस पाडणे सुरू केले आहे.  लोकानुनय करणाऱ्या घोषणांवर खर्च करण्याऐवजी उत्पादक खर्चाकडे राज्यांचा कल असावा असे १५ व्या वित्त आयोगाने स्पष्ट म्हटले आहे. मात्र, सत्ताकारणाला प्राधान्य असलेल्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी या सूचनेकडे वेळोवेळी दुर्लक्ष केल्याचा अनुभव आहे. उत्पादक कामांवर खर्च केला तर त्यातून निर्माण झालेल्या सुविधांद्वारे राज्याच्या उत्पन्नात वाढ होते, पण लोकानुनय हाच उद्देश असलेल्या योजना मोफत राबविल्या जातात आणि राज्याचे उत्पन्न वाढण्यासाठी त्याचा काहीएक उपयोग होत नाही असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.

भांडवली खर्च एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ १० टक्केच  राज्याचा भांडवली खर्च हा एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ १० टक्के इतकाच आहे. त्यातून आपण कर्ज आणि त्यावरील व्याज फेडतो. प्रत्यक्ष उत्पादक कामांवरील खर्चासाठी फारच कमी पैसा हातात उरतो. भांडवली खर्चासाठीच्या राखीव पैशांतून कर्ज फेडावे लागते अशी अवस्था आहे. 

दोन दिवसांत पडलेला मोफत घोषणांचा सर्वपक्षीय पाऊस- महिलांना दरमहा ३ हजार रु. देणार, महिलांना मोफत प्रवास, शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी, बेरोजगारांना दरमहा ४ हजार रु. - महाविकास आघाडी- लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रु. देणार -   एकनाथ शिंदे- जीवनावश्यक पाच वस्तूंचे दर पाच वर्षे स्थिर ठेवणार - एकनाथ शिंदे/उद्धव ठाकरे- १० लाख विद्यार्थ्यांना १० हजार रु. विद्यावेतन देणार - एकनाथ शिंदे-मुलांना मोफत शिक्षण देणार - उद्धव ठाकरे-लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रु., धान उत्पादकांना २५ हजार रु. बोनस, विद्यार्थ्यांना मासिक विद्यावेतन, ४४ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज, ५२ लाख कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर- अजित पवार..तर असेल कर्जाचाच आधारराज्याची राजकोषीय तूट १ लाख ९० हजार कोटी रुपये इतकी आहे. ती भरून काढायची तर कर्जाचाच आधार घ्यावा लागणार आहे. त्यातच महायुती सरकारने जाता-जाता १ लाख १२ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार राज्याच्या तिजोरीवर पडेल अशा मोफत घोषणा केलेल्या आहेत. त्यासाठीची तरतूदही आगामी काळात करावी लागणार आहे. कोणतेही सरकार आले तरी लोकानुनयाच्या घोषणा रद्द केल्यास लोकांचा रोष ओढावेल, या भीतीने अशा घोषणा रद्द होण्याची शक्यता कमीच असल्याचे म्हटले जाते.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी