शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 13:26 IST

Maharashtra Assembly Election 2024: जोरगेवार यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्यास सुधीर मुनंगटीवार यांनी तीव्र विरोध केला होता. मात्र दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी किशोर जोरगेवार (Kishore Jorgewar) यांच्या पक्षप्रवेशास मान्यता दिल्याने सुधीर मुनगंटीवार यांचा विरोध मावळला. तसेच आज सकाळी सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या उपस्थितीतच जोरगेवार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा हो नाही करत अखेर भाजपामध्ये प्रवेश झाला आहे. २०१९ साली अपक्ष म्हणून निडणून आलेल्या किशोर जोरगेवार यांनी २०२२ मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर किशोर जोरगेवार यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी जोरगेवार यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्यास सुधीर मुनंगटीवार यांनी तीव्र विरोध केला होता. मात्र दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी किशोर जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशास मान्यता दिल्याने सुधीर मुनगंटीवार यांचा विरोध मावळला. तसेच आज सकाळी सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीतच जोरगेवार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. किशोर जोरगेवार यांना चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. 

अपक्ष आमदार म्हणून महायुतीसोबत असलेल्या किशोर जोरगेवार यांना भाजपामध्ये घेण्यास सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र विरोध केला होता. त्यानंतर किशोर जोरगेवार शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते, परंतु त्याला स्थानिक काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोध केला. त्यानंतर जोरगेवारांचा राष्ट्रवादीतील पक्षप्रवेश खोळंबला होता. त्यानंतर ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या होत्या. मात्र जोरगेवार यांचा पक्षप्रवेस रोखण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी स्थानिक पातळीपासून दिल्लीपर्यंत मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे किशोर जोरगेवार हे पुन्हा अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते.  मात्र अखेरीत पक्षश्रेंष्ठींनी जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशास हिरवा कंदील दाखवला. किशोर जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशामागे माजी खासदार हंसराज अहिर यांचे पाठबळ लाभले त्यामुळे जोरगेवारांचा भाजपा पक्षप्रवेश निश्चित झाला, असे सांगण्यात येत आहे, 

दरम्य्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत किशोर जोरगेवार यांनी अपक्ष निवडणूक लढवताना भाजपा आणि काँग्रेसच्या मातब्बर उमेदवारांचा पराभव केला होता. त्या निवडणुकीत किशोर जोरगेवार यांनी भाजपाचे तत्कालीन विद्यमान आमदार नानाजी शामकुळे यांचा तब्बल ७२ हजार ६६१ मतांनी पराभव केला होता. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाchandrapur-acचंद्रपूरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार