शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"लोकांना सरकारबद्दल आपुलकी आहे म्हणूनच..."; मतदानाची टक्केवारी वाढल्यावर फडणवीसांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 14:10 IST

लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मतदानाची टक्केवारी वाढल्याची शक्यताही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडलं. विधानसभा निवडणुकीत राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. लोकसभेपेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. अखेरच्या काही तासांत मतदान मतदानाची आकडेवारी वाढल्याचे दिसून आलं. या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. लोकांना सरकारच्या बद्दल थोडी आपुलकी वाटल्याने मतदान वाढल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

रात्री उशिरा आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ६५.११ टक्के मतदान झालं आहे.  गेल्या ३० वर्षांमध्ये पहिल्यांदाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे याचा परिणाम निकालावर देखील होणार आहे. या वाढलेल्या मतदानाचा महायुतीला फायदा होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मतदानाची टक्केवारी वाढल्याची शक्यताही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

"महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेला आहे महाराष्ट्र मध्ये मतदान वाढलेले आहे मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आजपर्यंतचा अनुभव असा आहे की जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते त्याचा भाजप आणि मित्र पक्षांना फायदा होतो. त्यामुळे आम्हाला आशा आहे की वाढलेल्या मतदानाचा आम्हाला निश्चितपणे फायदा मिळेल आणि महाराष्ट्रात आमचे सरकार तयार होईल अशी मला अपेक्षा आहे. मी २५ ते ३० मतदारसंघाच्या बुथवर फोनवरून संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितले की महिलांची टक्केवारी वाढली आहे. आम्ही अजून कोणासोबत संपर्क साधलेला नाही तसेच एक्झिट पोलवर प्रवक्ते बोलतात प्रमुख नेते बोलत नाहीत," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

"लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली ही शक्यता नाकारता येत नाही. २३ तारखेला निकाल लागल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि चांगला निर्णय करू. मतदानाची टक्केवारी ज्या प्रकारे वाढली आहे त्यानुसार थोडासा मला प्रो इन्कम्बन्सी फॅक्टर दिसतो. लोकांना सरकारच्या बद्दल थोडी आपुलकी वाटणं हा त्याचा अर्थ होतो, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा