शहरं
Join us  
Trending Stories
1
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
2
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
3
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 07:22 IST

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी अनेक बंडखोरांनी रिंगणात कायम राहण्याची भूमिका घेतल्याने महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींची डोकेदुखी वाढली आहे.

 मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी अनेक बंडखोरांनी रिंगणात कायम राहण्याची भूमिका घेतल्याने महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींची डोकेदुखी वाढली आहे. राज्यभरातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात बंडखोर उमेदवार रिंगणात असून सर्वच पक्षांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. 

ज्या पक्षाकडे जागा गेली, त्या पक्षात बंडखोरी झाल्याचे तसेच मित्रपक्षांच्या जागांवरही दोन्हींकडे बंडखोरी झाल्याचे चित्र सर्वदूर दिसत आहे. दुपारी तीनपर्यंत अर्ज मागे घ्यावेत यासाठी दोन्ही बाजूंकडील वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. काही ठिकाणी यश आले; पण अनेक ठिकाणी बंडखोरांनी नेतृत्वाचे न ऐकता आव्हान कायम ठेवले आहे. त्यामुळे बंडखोर असलेल्या मतदारसंघांमध्ये त्रिकोणी वा बहुरंगी लढतींचे चित्र आहे.

४,१४० उमेदवार रिंगणातराज्यातील विधानसभा निवडणुकसाठी २८८ मतदारसंघात ७ हजार ७८ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते. त्यातील सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत २,९३८ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता राज्यात ४ हजार १४० उमेदवार अंतिमत: निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

माहीमसाठी ड्रामा : राज ठाकरेंनी भेट नाकारली, सरवणकर यांचा मैदानात कायम राहण्याचा निर्णयमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्याविरुद्ध शिंदेसेनेचे सदा सरवणकर यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे मुंबईतील माहीम मतदारसंघात सरवणकर, ठाकरे आणि उद्धवसेनेचे महेश सावंत अशी लढत आहे. अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका भाजपने घेतली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी भूमिका घेतली नाही. सरवणकर यांनी शिंदेंशी चर्चा करून उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. राज ठाकरेंनी आपल्याशी भेटायला नकार दिला, असा आरोप सरवणकर यांनी केला. 

श्रीगोंदामध्ये भाजपतर्फे आईऐवजी मुलगा रिंगणातश्रीगोंदा मतदारसंघात भाजपच्या प्रतिभा बबनराव पाचपुते यांना भाजपने उमेदवारी दिली होती पण त्यांनी माघार घेतली. त्याचवेळी त्यांचे पुत्र विक्रम यांनीही पर्यायी उमेदवार म्हणून भाजपकडूनच अर्ज भरला होता. त्यामुळे विक्रम हे तिथे भाजपचे उमेदवार असतील. 

डॉ. जिचकारांच्या मुलाची बंडखोरी कायमकाटोलमध्ये (जि. नागपूर) काँग्रेस नेते दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांचे पुत्र युवक काँग्रेसचे याज्ञवल्क्य यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. डॉ. जिचकार यांच्या पत्नी राजश्री यांनी माघार घेतली. येथे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेडमध्ये काँग्रेसचे माजी आमदार विजयराव खडसे, भाजपचे माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी बंड कायम ठेवले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी