शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी 'ती'ला किती संधी; ३६० महिला उमेदवार उतरल्या रिंगणात, अपक्ष झाल्या दुप्पट

By दीपक भातुसे | Updated: November 9, 2024 11:44 IST

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभेच्या रिंगणात महिला उमेदवारांची संघ्या २०१९ च्या तुलनेत वाढली असून, त्यात अपक्ष महिला उमेदवार दुपटीने वाढल्या आहेत. यंदा ३६० महिला उमेदवार रिंगणात असून, त्यात २३६ जणींनी अपक्ष अर्ज भरलेला आहे.

-  दीपक भातुसेमुंबई  - विधानसभेच्या रिंगणात महिला उमेदवारांची संघ्या २०१९ च्या तुलनेत वाढली असून, त्यात अपक्ष महिला उमेदवार दुपटीने वाढल्या आहेत. यंदा ३६० महिला उमेदवार रिंगणात असून, त्यात २३६ जणींनी अपक्ष अर्ज भरलेला आहे. गेल्या वेळी २४ महिला आमदार होत्या. यंदा किती जणींसाठी विधानसभेची द्वारे खुलतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर अजित पवार गटाच्या पाथरीच्या उमेदवार निर्मला विटेकर यांची उमेदवारी रद्द करून त्यांचा मुलगा राजेश विटेकर याला उमेदवारी दिली, तर शरद पवार गटाने मोहळच्या सिद्दी कदम यांची उमेदवारी रद्द करून राजू खरे यांना दिली आहे. भाजपकडूनही श्रीगोंदा मतदारसंघातील महिला उमेदवार प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी बदलून त्यांचा मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी आहे. अजित पवार गटाकडून सना मलिक यांना अणुशक्तीनगर येथून  उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या या उमेदवारंनी प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे.

केवळ एकाच ठिकाणी...राज्यातील २८८ मतदारसंघांपैकी केवळ एकाच मतदारसंघात महिला उमेदवार आमने - सामने आहेत. यात पुण्यातील पर्वती मतदारसंघात भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्याविरोधात शरद पवार गटाच्या अश्विनीताई कदम रिंगणात आहेत. 

          भाजप महिला         उमेदवार (१७)        मनीषा चौधरी - दहिसरविद्या ठाकूर - गोरेगावभारती लवेकर - वर्सोवास्नेहा दुबे - भाजपसुलभा गायकवाड - कल्याण पूर्वमंदा म्हात्रे - बेलापूरमाधुरी मिसाळ - पर्वतीमोनिका राजळे - शेवगावदेवयानी फरांदे - नाशिक मध्यसीमा हिरे - नाशिक पश्चिमनमिता मुंदडा - केजअर्चना पाटील-चाकूरकर - लातूर शहरमेघना बोर्डीकर - जिंतूरअनुराधा चव्हाण - फुलंब्रीश्वेता महाले - चिखलीश्रीजया चव्हाण - भोकरसई डहाके - करंजा शिंदेसेना (७)        सुवर्णा करंजे - विक्रोळीमनीषा वायकर - जोगेश्वरी पूर्वयामिनी जाधव - भायखळाशायना एनसी - मुंबादेवीमंजुळा गावित - साक्रीसंजना जाधव - कन्नडभावना गवळी - रिसोड

अजित पवार गट (५)        सना मलिक - अणुशक्तीनगरआदिती तटकरे - श्रीवर्धनमीनल साठे - माढासरोज आहिरे - देवळालीसुलभा खोडके - अमरावतीशरद पवार गट (११)        राखी जाधव - घाटकोपर पूर्वसुलक्षणा शीलवंत - पिंपरीअश्विनीताई कदम - पर्वतीनंदिनी कुपेकर - चंदगडअरुणादेवी पिसाळ - वाईराणी लंके - पारनेरदीपिका चव्हाण - बागलाणसुनीता चारोस्कर - दिंडोरीरोहिणी खडसे - मुक्ताईनगरमयुरा काळे - आर्वीभाग्यश्री आत्राम - अहेरीउद्धवसेना (१०)        ऋतुजा लटके - अंधेरी पूर्वप्रविणा मोरजकर - कुर्लाश्रद्धा जाधव - वडाळालीना गरड - पनवेलस्नेहल जगताप - महाडअनुराधा नागवडे - श्रीगोंदाजयश्री महाजन - जळगाव शहरवैशाली सूर्यवंशी - पाचोराजयश्री शेळके - बुलडाणारुपाली पाटील - हिंगोली काँग्रेस (८)        संगीता वाझे - मुलुंडज्योती गायकवाड - धारावीप्रभावती घोगरे - शिर्डीस्वाती वाकेकर - जळगाव जामोदमीनल पाटील-खतगावकर - नायगावयशोमती ठाकूर - तिवसापूजा तावकर - भंडाराअनुजा केंदार - सावनेर

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४WomenमहिलाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी