शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

स्वबळाच्या डरकाळ्या! विधानसभेला मविआ, महायुतीचे समीकरण फिसकटणार? सर्वांकडून स्वतंत्र चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 09:13 IST

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तसेच महायुतीचे समीकरण जुळणार की फिसकटणार,  याची चर्चा आता सुरू झाली आहे. 

 मुंबई - लोकसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटकपक्षांनी स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २८८ मतदारसंघात विधानसभा तयारीचे आदेश संपर्कप्रमुखांना दिल्यानंतर त्यापाठोपाठ मनसेनेही गुरुवारी स्वबळावर २२५ जागा लढण्याची तयारी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेसाठी २८८ जागांच्या संघटनात्मक बांधणीवर भर देणार असल्याचे सांगत स्वबळाचे संकेत दिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तसेच महायुतीचे समीकरण जुळणार की फिसकटणार,  याची चर्चा आता सुरू झाली आहे. 

महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निकालानंतर मुंबईत रंगशारदा सभागृहात घेतलेल्या पहिल्याच बैठकीत कार्यकर्त्यांना २०० ते २२५ जागांवर निडणूक लढवण्याची तयारी करा, असे आदेश दिले. जागांसाठी महायुतीवर अवलंबून न राहता स्वबळावर लढण्याची मानसिकता मनसेकडून करण्यात आली आहे.  

जिथे चांगली मते, तिथे उमेदवार- आगामी विधानसभेसाठी आमची युतीसाठी कोणाशीही चर्चा सुरू नाही. आतापर्यंत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवल्या आहेत. ज्या मतदारसंघात आम्हाला आजपर्यंत चांगली मते मिळाली आहेत, तिथे निश्चित आमचे उमेदवार देऊ. मनसेचे निरीक्षक लवकरच राज्याचा दौरा करतील.  त्यासंदर्भातील अहवाल राज यांना सादर केला जाईल, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. 

बच्चू कडूंचाही स्वबळाचा नारा- प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनीही राज्यात स्वतंत्रपणे विधानसभेच्या २० जागा लढविणार असल्याची घोषणा केली आहे.- संभाव्य उमेदवारांसोबत बैठक घेऊन विचारविनिमय केला जाईल. त्यानंतर आम्ही पुढील पाऊल टाकणार आहोत, असे कडू यांनी सांगितले.  

उद्धवसेना अजमावत आहे ताकदउद्धव ठाकरे यांच्याकडूनही संपर्कप्रमुख, विभागप्रमुख, आमदारांच्या बैठका सुरू आहेत. एकत्र निवडणुकांना सामोरे जाऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तयारी करा, असे सांगितले जात आहे तर दुसरीकडे मतदारसंघनिहाय पक्षाची ताकद तपासली जात आहे. 

पक्षसंघटना मजबूत करणार : पटोले- लोकसभेला काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ जागांवर संघटनात्मक बांधणी केली होती, त्याचा फायदा काँग्रेसबरोबरच महाविकास आघाडीला झाला. - आताही विधानसभेसाठी २८८ जागांवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.  - एकत्रित लढायचे असले तरी संघटनात्मक तयारी करायला लागते. त्याचा फायदा मित्र पक्षांनाही होतो, असेही ते म्हणाले. 

आम्हाला चुरा तरी राहू द्या : सदाभाऊ  खोत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनीही आपली खदखद व्यक्त केली. महायुतीतील बड्या मित्र पक्षांनीही समजून घ्यायला हवे, आम्ही काय बैलगाड्यांना फक्त वंगण घालायला बसलोय का? बुंदीचे लाडू तुम्ही खात असाल, तर चुरा तरी आमच्या नशिबी राहू द्या, अशा शब्दात त्यांनी मन मोकळे केले.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रvidhan sabhaविधानसभाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी