शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 07:15 IST

Maharashtra Assembly Election 2024: पैसे न दिल्यास मशीन सेट करणारे माझ्या ओळखीचे असून त्यांना सांगून तुमचा पराभव निश्चित असल्याचे सांगत ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. या भामट्याला पोलिसांनी ४ तासांत ताब्यात घेतले.

 नाशिक -  उद्धवसेनेचे नाशिक मध्यमधील उमेदवार व माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयात येत ईव्हीएम मशीन हॅक करीत तुम्हाला विजयी करून देतो, त्यासाठी ४२ लाख रुपये लागतील, पैसे न दिल्यास मशीन सेट करणारे माझ्या ओळखीचे असून त्यांना सांगून तुमचा पराभव निश्चित असल्याचे सांगत ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. या भामट्याला पोलिसांनी ४ तासांत ताब्यात घेतले.

पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी (दि. ५) दुपारी १२ वाजता मुंबई नाका येथील उमेदवाराच्या कार्यालयात भगवानसिंग चव्हाण हा परप्रांतीय युवक आला. कार्यालयातील आनंद शिरसाठ यांना ‘मी तुम्हाला ईव्हीएम मशीन हॅक करून १० मतदानापैकी ३ ते ४ मते तुम्हाला मिळवून देऊन निवडणुकीमध्ये जिंकून देताे. बदल्यात ४२ लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्यापैकी ५ लाख आता द्यावे, अशी मागणी केली. पदाधिकाऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर पैसे न दिल्यास प्रोग्रामिंग करणारे माझे ओळखीचे आहेत. मशीन हॅक करून तुमचा उमेदवार पराभूत करेन, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर तो पत्ता सांगून निघून गेला. शिरसाठ यांनी याप्रकरणी बुधवारी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पाेलिसांनी भगवानसिंगला उचलले.

पैसे कमविण्याचा फंडा...निवडणुकांमध्ये पैसे कमविण्याची संधी पाहून आपण हा प्रकार केल्याचे त्याने कबूल केले. भगवानसिंग चव्हाण (३४, रा. गोगरा अजमेर, राज्य राजस्थान, सध्या रा. विठूमाऊली कॉलनी, म्हसरूळ लिंक रोड) १५ ते २० दिवसांपूर्वीच शहरात रोजगाराच्या निमित्ताने शहरात आला हाेता.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४EVM Machineईव्हीएम मशीनCrime Newsगुन्हेगारीnashik-central-acनाशिक मध्य