शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात विधानसभा निवडणूक केव्हा लागणार? जयंत पाटलांनी तारीख सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 17:39 IST

उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे, अशातच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करून टाकली आहे. 

महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आता मोठा युद्ध रंगणार आहे. लोकसभेला महायुतीचा दारुण पराभव झाल्याने मविआमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याच्या जोरावर विधानसभेलाही सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्याच्या योजना विरोधकांकडून आखल्या जात आहेत. उद्यापासून पावसाळी अधिवेशन  सुरु होत आहे, अशातच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करून टाकली आहे. 

महायुतीमध्ये सारे काही आलबेल नसून शिंदे शिवसेना, भाजपा आणि अजित पवार राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीचे अपयश शिवसेना आणि भाजपा अजित पवारांवर लादत आहेत. तर अजित पवार गटही दोघांना जोरदार प्रत्यूत्तर देत आहे. यामुळे अजित पवार गट महायुतीत राहणार की बाहेर पडणार याचीही चर्चा रंगू लागली आहे.

 अजित पवार गटातील आमदार नाराज असून ते लवकरच शरद पवारांकडे परतण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यात छगन भुजबळांचे नावही आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनीच कोणाला परत घेणार कोणाला नाही याची अट जाहीर केली आहे. तसेच मविआच्या मित्रपक्षांनाही विचारणार असल्याचेही म्हटले आहे. यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांची अवस्था ना घर का ना घाट का अशी होणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. शिवसेनेलाही उद्धव ठाकरे यांच्यामुळे चांगला प्रतिसाद मिळेल. विधानसभा निवडणुकीत तिनही पक्षांना चांगला प्रतिसाद मिळेल, काही दिवसातच जागावाटपावर चर्चा होणार आहे, असंही आमदार जयंत पाटील म्हणाले. आमच्या पक्षाला मधल्या काळात मोठ्या प्रमाणात त्रास झाला. त्यामुळे जे पक्षासाठी योग्य आहे तोच निर्णय घेऊ, असंही पाटील म्हणाले. यावेळी पाटील यांनी विधानसभा निवडणूक २० ऑक्टोबरला होईल असे सांगितले.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलvidhan sabhaविधानसभाMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024