शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 19:49 IST

जो काम करत नाही त्याला ठेच लागणार कशी, कारण तो एकाच जागेवर बसून असतो. काही करत नाही. स्वत:चं नाकर्तेपण दडवण्यासाठी चिखलफेक करायची असं उदयनराजेंनी म्हटलं. 

कराड - देवेंद्र फडणवीस आज इतकं काम करतायेत, जो माणूस काम करतो त्याला आज धमक्या मिळतायेत. जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. माणसांनी काम करायचं नाही का?, मग अशा व्यक्तीच्या मागे, पक्षामागे, युतीमागे आपण उभं राहणार नसेल तर कुणाच्या मागे उभं राहायचं हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:च्या मनाला विचारला पाहिजे असं खासदार उदयनराजे यांनी म्हटलं. 

कराडच्या जाहीर सभेत उदयनराजे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र इथल्या लोकांना केवळ झुलवत ठेवलं गेले. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचे प्रश्न होते, ते सोडवले नाहीत. राजकारणात सगळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फक्त आश्वासने दिली. आश्वासन देताना आपण जेव्हा लोकांसमोर जातो, आशीर्वाद देत आमदार, खासदार बनवतात. मात्र लोकांचं ऋण कधी फेडले गेले नाही. त्यामुळे फार याकडे लक्ष देऊ नका. वर नरेंद्र आणि खाली देवेंद्र अशी म्हण आहे. आधीच्या काळात योजना पूर्ण झाल्या असत्या तर तेव्हाचे तरूण जे आज त्यांचे वय झाले त्यांचे आयुष्य व्यर्थ गेले नसते. लोकांची जास्तीत जास्त प्रगती झाली पाहिजे यादृष्टीने आम्ही कार्यरत असणार आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच महायुती आणि आघाडीतला फरक सांगतो, जेव्हा लोक विचारांनी एकत्र येतात तेव्हा युती होते. लोक कल्याणाचा विचार घेऊन लोकांसमोर जातो. लोकांचे हित पाहतो. त्यांच्या अडीअडचणी सोडवतो. आज देशात अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता होती. ५० हून अधिक वर्ष देशात सत्ता असताना योजना का राबवल्या गेल्या नाही. वैचारिक दृष्ट्‍या युती केली जाते. जो महाराजांचा विचार होता, तो लोक कल्याण हे मनात ठेवून ध्येय गाठायचे असते. विचारांनी एकत्र आलेले त्यांना कुठल्याही आमिषाची गरज भासत नाही. राज्यात आणि इतर राज्यात जिथे युतीचं भाजपाचं सरकार आहे तिथे चांगल्या योजना राबवल्या गेल्यात असंही उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, सत्ता मिळवण्यासाठी स्वत:च्या हिंमतीवर काही करू शकत नसते, मग याला पकड, त्याला पकड असं करून बनलेली आघाडी असते. आज आघाडीची अवस्था पाहा. कोल्हापूरात बघा काय घडले, हीच अवस्था राज्यभरात आहे. जो काम करतो त्याला ठेच लागते. जो काम करत नाही त्याला ठेच लागणार कशी, कारण तो एकाच जागेवर बसून असतो. काही करत नाही. स्वत:चं नाकर्तेपण दडवण्यासाठी चिखलफेक करायची. चिखलफेक करून काही होत नाही मग व्यक्ती दोषावर उतरायचं.  एकदा चूक घडली तर ५ वर्ष पश्चातापाची वेळ येते. गेलेली वेळ अन् समुद्राच्या लाटा कुणासाठी थांबत नसतात. आपल्या आयुष्यातील ५ वर्ष, कुटुंबातील जे तरुण उद्याचा भविष्यकाळ आहेत. त्यांचा विचार करून महायुतीच्या मागे राहावे असं आवाहन उदयनराजेंनी जनतेला केले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४karad-north-acकराड उत्तरwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवार