शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 14:20 IST

Maharashtra Assembly Election 2024 : नरेंद्र मोदींच्या जाहीर सभा ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तर ६ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी आरएसएसचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. 

Maharashtra Assembly Election 2024 :  मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणूक प्रचाराला आता वेग आला असून काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांचे दौरे सुरू झाले आहेत. अनेक बडे नेते पुढील १३ दिवस महाराष्ट्राचा झंझावाती दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात ११ सभा घेणार आहेत. नरेंद्र मोदींच्या जाहीर सभा ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तर ६ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी आरएसएसचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. 

विधानसभा निवडणुकीसाठी १८ ऑक्टोबरला सायंकाळी निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे 'ट्रम्प कार्ड' साबित झालेले योगी आदित्यनाथ मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात १५ निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत. योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा जास्त प्रचार सभांना हजेरी लावतील. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांची महाराष्ट्रातील उपस्थिती आणि 'बंटेंगे तो कटेंगे' या घोषणेचा परिणाम राज्यातील विधानसभा निवडणुकीतही दिसून येईल, असे जाणकारांचे मत आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या हरयाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांचा करिष्मा दिसून आला. योगी आदित्यनाथ यांचा जम्मू-काश्मीरमध्ये स्ट्राइक रेट ९० टक्के आणि हरयाणामध्ये जवळपास ६५ टक्के होता. जम्मूमध्ये योगींनी पाच विधानसभा मतदारसंघात निवडणूक रॅली घेतल्या, त्यापैकी चार जागा भाजपने जिंकल्या. किश्तवाड आणि कठुआसारख्या मुस्लिमबहुल जागा जिंकण्यात भाजपला यश आले.हरयाणातही योगी आदित्यनाथ यांनी २० विधानसभा मतदारसंघात प्रचार केला, त्यापैकी १३ जागा भाजपने जिंकल्या.भाजपला हरयाणात तिसऱ्यांदा सत्तेत आणण्यासाठी हा विजय महत्त्वाचा ठरला.

हरयाणा ते कॅनडापर्यंत 'बंटेंगे तो कटेंगे'च्या घोषणायोगी आदित्यनाथ यांनी हरयाणाच्या निवडणुकीतच 'बंटेंगे तो कटेंगे'ची घोषणा केली होती. ही घोषणा इतकी लोकप्रिय झाली की भाजप समर्थकांनी मतदान नसलेल्या राज्यातही त्याचा वापर करण्यास सुरुवात केली. याशिवाय, कॅनडात झालेल्या मंदिरावरील हल्ल्यानंतर हिंदू समुदायाने आपल्या निदर्शनावेळी 'बंटेंगे तो कटेंगे' अशा घोषणा दिल्या. तसेच, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मुंबईसह राज्याच्या अनेक भागात योगी आदित्यनाथ यांचे फोटो असलेले 'बंटेंगे तो कटेंगे'चे पोस्टर लावण्यात आले होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण