शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 17:21 IST

Maharashtra Assembly Election 2024: 'लाडकी बहना म्हणायचं आणि बहिणीचे हे हाल करायचे'. मतासाठी काही करता," असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

संगमनेरमधील धांदरफळ बुद्रुक येथे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचार सभेत भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्यासह त्यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्यासंदर्भात आक्षेपर्ह वक्तव्य केले होते. जयश्री थोरात यांच्यासंदर्भातील या वक्तव्याच्या निषेधार्थ थोरात समर्थकांनी शनिवारी येथील पोलिस ठाण्याबाहेर आठ तास ठिय्या आंदोलनही केले. यानंतर पोलिसांनी वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना पुण्यातून ताब्यातही घेतले. याच बरोबर, आचारसंहिता असताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जयश्री थोरात यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे संगमनेरमधील राजकीय वातावरण तापले आहे. यावर आता, 'लाडकी बहना म्हणायचं आणि बहिणीचे हे हाल करायचे'. मतासाठी काही करता," असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

यावर बोलताना थोरात म्हणाले, "संपूर्ण महाराष्ट्राने सभेतील ते वक्तव्य बघितले. त्याला प्रोत्साहन देणारे हे विखेच होते. हे काही नाकारता येणार नाही. त्यांनी वक्तव्य केले. तो गुन्हेगार आहे, यासाठी त्याला शिक्षाकरण्याऐवजी, आता त्यांनी जयश्रीवरच गुन्हा दाखल केला आहे. म्हणजे आपले प्रशासन कोणत्या दिशेने चालेल आहे. हे वेगळे सांगण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. आता प्रशानस चोराला पकडण्याऐवजी ज्याची चोरी झाली आहे, त्यालाच पकडायला निघाले आहेत, असे चित्र दिसत आहे. म्हणजे गुन्हेगाराला पकडण्याएवजी, ज्याला त्रास झाला त्यालाच पकडायला निघाले आहेत, अशी अवस्था आहे."

"लाडकी बहना म्हणायचं अन्..." -थोरात म्हणाले, "त्या मुलीवर गुन्हा दाखल करत आहेत, तिच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करत आहेत. हे अत्यंत पराकोटीचं दुर्दैवी असे कृत्य प्रशासन करत आहे. हे निषेधार्ह आहे. असे आहे की, हे त्यांचे सर्व सहकारी असतील, प्रक्षोभ तर होणारच ना मनामध्ये. म्हणून एकत्र आलेतर गुन्हा दाखल होऊ शकतो. ही तर आश्चर्यकारकच गोष्ट आहे आणि माझी जनता तर निषेध करेलच, पण महाराष्ट्रातील जनतासुद्धा महायुतीचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही आणि ते आपल्याला मतांच्या रुपाने दिसल्याशिवाय राहणार नाही. एवढेच नाही तर, 'लाडकी बहना म्हणायचं आणि बहिणीचे हे हाल करायचे'. मतासाठी काही करता," असेही थोरात यांनी म्हटले आहे. ते मुंबईत एबीपी माझासोबत बोलत होते.

तर जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही -मुलीवरील टीकेसंदर्भात बोलताना थोरात म्हणाले, "जी टीका केली गेली, तिची जी हीन आणि गलिच्छ पातळी आहे, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणातील भाषणाची, बोलण्याची पातळी बदलली होती. त्या पातळीचा शेवट, तळ गाठला गेलाय आता. एवढ्या वाईट पातळीवर जाऊन ते भाषण केलं गेलं आहे. आता मुली म्हणून मला वाईट वाटणे सहाजिकच आहे. ती फार भक्कम आहे. ठीक आहे तिची लढण्याची तयारी आहे. राजकारणात ते असावेही. तीने ते सर्व करण्याची तयारीही ठेवली आहे. परंतू केवळ त्या मुलीसाठी वाईट वाटते असे नाही. तर त्यांनी संपूर्ण महिला वर्गालाच शिवी दिली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुम्ही लाडकी बहिण म्हणायचं आणि बहिणींनाच शिव्या द्यायच्या, एवढ्या वाईट पद्धतीने बोलायचे, हे जर महायुतीचे धोरण असे, तर जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही." 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sujay Vikheसुजय विखेSangamnerसंगमनेरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात