शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 17:20 IST

राज ठाकरेंच्या टीकेला आता उपमुख्यंत्री अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Ajit Pawar Slams Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेतून महायुती आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. राज ठाकरेंनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला होता. शिवसेना आणि धनुष्यबाणावरील मालकी संदर्भावरूनही राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेवर टीकास्त्र डागलं होतं. यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख करत अजित पवार यांच्यावर घणाघात केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांची प्रॉपर्टी नाही असं म्हटलं होतं. राज ठाकरेंच्या टीकेला आता उपमुख्यंत्री अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ठाण्यातल्या सभेत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि अजित पवारांवर निशाणा साधला होता. शिवसेना ही काही शिंदेंची किंवा उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं. यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा उल्लेख करत अजित पवार यांच्यावरही राज ठाकरेंनी टीका केली होती. राज ठाकरे यांच्या पक्ष आणि चिन्हावरील वक्तव्यावरुन अजित पवारांनी भाष्य केलं आहे. कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही, म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार इंदापुरातून बोलत होते.

"काहीजण म्हणतात अमुक चोरलं तमुक चोरलं. कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही. त्यामध्ये आमदार महत्त्वाचे असतात. संघटना, संघटनेतील जिल्हाध्यक्ष महत्त्वाचे असतात. संघटनेतील कार्यकर्ते महत्त्वाचे असतात. त्यांच्यावर संघटना चालत असते. संघटना कुणा एकाच्या मालकीची नसते. काल कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर आरोप करत होते. राज ठाकरे तर कधी काय बोलतील सांगता येत नाही. मध्येच म्हणतात अजित पवार जातीवाद करत नाहीत. त्यामुळे त्या गोष्टीकडे फार महत्त्व देऊ नका," असा पलटवार अजित पवारांनी केला आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

"शिवसेना आणि धनुष्यबाण ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची आहे, ती प्रॉपर्टी बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. माझे शरद पवारांच्या भूमिकांबद्दल मतभेद आहेत, पण तरीही एक गोष्ट सांगेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे ती अजित पवारांची नाही," असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार