शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 07:47 IST

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास महिलांना दरमहा ३ हजार रुपये आणि बेरोजगार तरुणांना चार हजार रुपये देण्याची घोषणा करीत मविआने काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते बुधवारी आपल्या प्रचाराचा नारळ मुंबईत फोडला.

 मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास महिलांना दरमहा ३ हजार रुपये आणि बेरोजगार तरुणांना चार हजार रुपये देण्याची घोषणा करीत मविआने काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते बुधवारी आपल्या प्रचाराचा नारळ मुंबईत फोडला. बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर आयोजित महाराष्ट्र स्वाभिमान सभेत पाच महत्त्वाच्या घोषणा असणारे ‘गॅरंटी कार्ड’ आघाडीने जाहीर केले.

देशात सध्या विचारधारेची लढाई सुरू आहे. एकीकडे डॉ. आंबेडकरांचे संविधान, एकता, सन्मान आणि दुसरीकडे लपूनछपून संविधानाला कमजोर करण्याचे काम करणारे भाजप, आरएसएस यांच्यातील ही लढाई आहे. पण, संविधानाला कुणीही संपवू शकत नाही. स्वाभिमानी जनता यासाठी इंडिया आघाडीच्या पाठिशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. नागपूरमध्ये सकाळी संविधान संमेलनात बोलताना त्यांनी आपले हक्क व अधिकारांपासून वंचित राहिलेल्या ९० टक्के भारतीयांना न्याय मिळवून देण्यास जातगणना होणारच, आरक्षणाची ५०% ची भिंतही तोडणार, असा निर्धार बोलून दाखविला. 

राहुल गांधी म्हणाले... संविधान कुणीही संपवू शकत नाही- मुंबई, महाराष्ट्र जाणतो धारावीची एक लाख करोड रुपये किमतीची जमीन, तुमची गरिबांची आहे. पण, तुमच्या डोळ्यासमोर तुमच्याकडून ती काढून घेतली जात आहे आणि ती एका अब्जाधीशाला दिली जात आहे.- राज्यातील सेमी कंडक्टर प्रकल्प, टाटा एरअबस, गेल पेट्रोकेमिकल, आयफोन प्रकल्प तुमचे होते, ते एकापाठोपाठ एक हिसकावून भाजपने गुजरातला नेले.- मोदी, भाजपच्या धोरणांनी बेरोजगारी वाढवली आहे. लहान आणि मध्यम उद्योजकांना यांनी एकामागून एक संपवले आहे. रोजगार अदानी, अंबानी देऊ शकत नाही.- संविधान संपले तर या देशातील दलित, आदिवासी, गरिबांच्या हातात काहीच राहणार नाही. तुमच्या हक्कांचे रक्षण संविधान करते. संविधान हे केवळ  पुस्तक नाही, तर या पुस्तकात महापुरुषांचे विचार, देशाचा आवाज आहे.- यात आंबेडकर, फुले, गांधीजी, बसवन्नाजी, नारायण गुरु, भगवान बुद्ध यांचा आवाज आहे. गरीब, मागासवर्ग, शेतकरी, दलित, आदिवासी, युवा यांचा आवाज यात आहे. - हळूहळू मोदी, भाजप आरएसएस या संविधानाला संपवण्याचे काम करत आहे. आम्ही सांगतो, संविधानाला कुणीही संपवू शकत नाही, असा इशारा त्यांनी दिला.

काँग्रेस गॅरंटी पूर्ण करणारा पक्ष : खरगेआम्ही महिलांना कर्नाटक, तेलंगनामध्ये दरमहा पैसे देतो, इथे आम्ही ३ हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. पण मोदींनी मागील दहा वर्षात एकही गॅरंटी पूर्ण केली नाही. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात आम्ही दिलेल्या गॅरंटी पूर्ण केल्या, असा दावा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केला.

५ जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणार : ठाकरे राज्यातील जनतेला सर्व प्रकारचे कर लावून महागाईच्या खाईत लोटणाऱ्या सरकारला सत्तेतून खाली खेचून आम्ही पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर कायम स्थिर ठेवणार आहोत. तसेच महिलांसाठी असलेल्या योजनेत अधिक भर घालू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. 

शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्ज माफ : शरद पवारमहाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये परतावा दिला जाईल, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे