शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

"फसवणूक नको आरक्षण द्या, आरक्षणाचे रोज नवीन गाजर"; पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 11:55 IST

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले.

राज्यविधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले. 'फसवणूक नको आरक्षण द्या', 'महायुती सरकारचा जागर, आरक्षणाचे रोज नवीन गाजर' म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. 

याप्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर धिक्कार असो, मराठा समाजाच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा - ओबीसींची  फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत सरकार विरोधात निदर्शने केली.

विधान सभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले. यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेच थोरात,  नितीन राऊत, अमीन पटेल, अमित देशमुख,धीरज देशमुख,जितेश अंतापुरकर ,भाई जगताप, राजेश राठोड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधिमंडळ गटनेते अजय चौधरी,राजन साळवी, नरेंद्र दराडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गटाचे) अनिल देशमुख, सुनील भुसारा , विनोद निकोले यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी मराठा आणि ओबीसी समाजाची आरक्षणाच्या मुद्द्यावर फसवणूक करणाऱ्या सरकारविरोधात घोषणा लिहिलेले फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. 

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2023Maratha Reservationमराठा आरक्षण