शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरमधील प्राचीन बौद्ध लेणी परिसरात भू-माफियांकडून अवैध उत्खनन, कठोर कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 17:35 IST

Maharashtra Assembly Budget Session 2026: छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बौद्ध लेणी आणि संरक्षित गुंफा परिसरात भू-माफियांकडून सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाचा मुद्दा आज विधानसभेत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला.

मुंबई - छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बौद्ध लेणी आणि संरक्षित गुंफा परिसरात भू-माफियांकडून सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाचा मुद्दा आज विधानसभेत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला. बुद्ध लेणी बचाव कृती समितीच्या आंदोलनाची दखल घेत, या तस्करीला जबाबदार असलेल्या महसूल अधिकाऱ्यांवर आणि भू-माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली.

छत्रपती संभाजीनगर येथील पहाडसिंगपुरा परिसरातील प्राचीन बौद्ध लेणी आणि हरसूल तलावापर्यंतच्या गायरान जमिनीवर अहोरात्र मोठ्या यंत्रांच्या सहाय्याने मुरुम, माती यांचे अवैध उत्खनन सुरू आहे. यामुळे पुरातत्त्वदृष्ट्या संवेदनशील असलेल्या टेकड्यांना आणि लेणींच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. मागील एक वर्षापासून जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी श्री. वेंकटेश राठोड, अपर तहसीलदार श्री. उमेश पाटील आणि नायब तहसीलदार श्री. परेश चौधरी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही गौण खनिज उत्खनन थांबलेले नाही, अशी माहिती औचित्याच्या माध्यमातून वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडली.

महसूल प्रशासनाकडून केवळ नोटिसा देण्याचे सोपस्कार पार पाडले जातात, परंतु प्रत्यक्षात कोणतीही दंडात्मक वसुली किंवा ठोस कारवाई केली जात नाही. रॉयल्टी चोरी आणि दंडात्मक कारवाईबाबत प्रशासन जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप वडेट्टीवर यांनी केला.

केवळ लेणी परिसरच नव्हे, तर गोदावरी नदी पात्रातून होणाऱ्या अवैध रेती उत्खननाबाबतही जिल्हा प्रशासनाविरुद्ध तक्रारींचा ओघ सुरू आहे.अवैध उत्खनन करणाऱ्या भू-माफियांवर तात्काळ गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी, तक्रारींची दखल न घेणाऱ्या आणि माफियांना छुप्या पद्धतीने मदत करणाऱ्या संबंधित महसूल अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात किती वाहनांवर कारवाई केली आणि किती दंड प्रत्यक्ष वसूल केला, याचा अहवाल सादर करावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Illegal excavation by land mafia near Aurangabad Buddhist caves: Demand for action.

Web Summary : Congress demands action against land mafia illegally excavating near Aurangabad's ancient Buddhist caves. Revenue officials are accused of inaction despite complaints, endangering historical sites. An inquiry into officials aiding the mafia and a report on penalties collected are requested.
टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMaharashtraमहाराष्ट्रvidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेस