शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

Maharashtra Vidhan Parishad Election: शेवटच्या क्षणी 'तो' आमदार न्यूयॉर्कवरुन परतला, विधान परिषद निवडणूक रंगतदार होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 08:52 IST

Maharashta Vidhan Parishad Election: राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान होत असून दहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि  भाजपामध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे.

Maharashta Vidhan Parishad Election: राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान होत असून दहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि  भाजपामध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. राज्यसभा निवडणुकीवेळी भाजपाने महाविकास आघाडीला चितपट करत आपले सर्व उमेदवार निवडून आणले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरणार असा विश्वास भाजपा आमदार व्यक्त करत आहेत. दहाव्यासाठी एक एक मत महत्वाचं ठरणार आहे. यातच राज्यसभा निवडणुकीवेळी बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतांची जोरदार चर्चा झाली होती. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही बविआच्या तीन मतांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. विधान परिषद निवडणुकीचे LIVE UPDATES पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बहुजन विकास आघाडीचे आमदार आणि हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र न्यूयॉर्कला गेले होते. त्यामुळे ते विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात होतं. पण नेमकं मतदानाच्या दिवशी आमदार क्षितीज ठाकूर मुंबईत परतले आहेत. त्यामुळे ते आज मतदानाला उपस्थित राहणार आहेत. 

हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांची मतं मिळावीत यासाठी राज्यातील प्रमुख उमेदवारांनी त्यांची भेट घेतली होती. पण क्षितीज ठाकूर नातेवाईकाच्या उपचारासाठी न्यूयॉर्कला गेल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मतदानाला ते उपस्थित नसतील अशी चर्चा होती. अखेरीस ते आज मुंबईत पोहोचले असून मतदान करणार आहे. बविआची ही तीन मतं कुणाला जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

नेत्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत खलबतंरात्री उशिरा मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या आघाडीच्या नेत्यांनी फोनवरून चर्चा केली. दरम्यान, फोर सीझन हॉटेलमध्ये जाऊन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी रात्री उशिरा काँग्रेसचे नेते व आमदारांशी चर्चा केली. देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्ष आमदार मुक्कामी असलेल्या हॉटेलात जाऊन मार्गदर्शन केले. ‘चिंता करू नका, आपल्याला विजय सोपा नसला तरी अशक्यप्राय काहीही नाही’ या शब्दांत विश्वास व्यक्त केला.  अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना काळजीपूर्वक मतदान करण्याचा सल्ला दिला. 

 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकVasai Virarवसई विरार