शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

महामंडळ घेणार होते राजीनामा! - श्रीपाल सबनीस यांचा गौप्यस्फोट

By admin | Published: January 09, 2016 4:21 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वक्तव्यावरून वादळ उठल्याने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मला लोकशाही पद्धतीने मिळालेल्या संमेलनाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या

श्रीपाल सबनीस यांचा गौप्यस्फोट : जीव गेला तरी राजीनामा देणार नसल्याची स्पष्टोक्तीराहुल कलाल / प्रज्ञा केळकर-सिंग,  पुणेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वक्तव्यावरून वादळ उठल्याने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मला लोकशाही पद्धतीने मिळालेल्या संमेलनाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या, असा गौप्यस्फोट ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना केला. जीव गेला तरी मी पदाचा राजीनामा देणार नाही. अशी माघार घेणे माझ्या तत्त्वात बसत नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. पंतप्रधानांबाबतच्या वक्तव्यानंतर उठलेला वाद आणि सनातन संस्थेच्या वकिलांनी केलेले ‘ट्विट’ या पार्श्वभूमीवर सबनीस यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘साहित्य महामंडळाच्या तटस्थ भूमिकेचे, छुप्या विरोधाचे आश्चर्य वाटते. संमेलनामध्येही भाषणाबाबत मला निर्बंध घालण्यात आले आहेत. परंतु, मी लोकशाही मार्गाने निवडून आलेलो आहे. समाजातील घडामोडींबाबत व्यक्त न होणे मला मान्य नाही. मी कोणत्याही एका विचारसरणीचा पुरस्कर्ता नाही. मी चुकीला विरोध करणारा आणि सत्याच्या पाठीशी उभा राहणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे स्पष्ट मत व्यक्त करण्याला मी घाबरत नाही. विचार परखडपणे व्यक्त करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला आहे. ’’संमेलनाच्या आमंत्रणासाठी सबनीसांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. मात्र, अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही. देवेंद्र फडणवीस सार्वजनिक कार्यक्रमांसाठी २ दिवस पुण्यात होते. मात्र, त्यांनी यावर भाष्य करणे टाळले. संमेलनाच्या उद्घाटनाला ते येणार की नाही, याची चर्चा आहे.श्रीपाल सबनीस कालपासून घराबाहेर पडलेले नाहीत. आज आकाशवाणीवर नियोजित मुलाखत असतानाही घरी येऊनच मुलाखत घ्या, असे त्यांनी सांगितले. काल रात्रीपासून विविध संस्था-संघटनांचे कार्यकर्ते त्यांना भेटण्यास जात आहेत. गुरुवारी रात्री साडेदहा वाजता स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी त्यांची भेट घेतली. याबाबत सबनीस म्हणाले, ‘‘मी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ता असल्याने अनेक दलित संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, दुर्दैवाने, पांढरपेशा म्हणविल्या जाणाऱ्या समाजातून कोणी साधा चौकशीचा फोनही केलेला नाही.’’राजीनाम्यातला ‘र’ही काढला नाहीसबनीस यांनी कुठल्या आधारावर हा आरोप केला आहे, याची माहिती नाही. महामंडळ म्हणून संमेलनाध्यक्षांचा राजीनामा मागण्याचा प्रश्नच येत नाही. राजीनाम्यातला ‘र’ही उच्चारलेला नाही. सबनीस यांनी हे विधान कुठल्या आधारावर केले, याची माहिती मी देऊ शकत नाही. याबाबतची माहिती त्यांच्याकडूनच समजू शकते. संमेलन ठरल्याप्रमाणे नियोजनबद्ध आणि संस्मरणीय होईल.- डॉ. माधवी वैद्य, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळगाढवावरून धिंड... सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजपाने संमेलनस्थळी त्यांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढली.