धुळ्याच्या महापौरपदी महाले
By Admin | Updated: June 18, 2016 01:36 IST2016-06-18T01:36:58+5:302016-06-18T01:36:58+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पना महाले यांची धुळ्याच्या महापौरपदी तर उपमहापौरपदी उमेर अन्सारी यांची शुक्रवारी निवड करण्यात आली. दोघांची ५० विरुद्ध १४ मतांनी निवड झाल्याचे

धुळ्याच्या महापौरपदी महाले
धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पना महाले यांची धुळ्याच्या महापौरपदी तर उपमहापौरपदी उमेर अन्सारी यांची शुक्रवारी निवड करण्यात आली. दोघांची ५० विरुद्ध १४ मतांनी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. शुक्रवारच्या निवडीमुळे धुळे महानगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता अबाधित राहिली आहे. मतदानावेळी एक नगरसेविका तटस्थ राहिली तर पाच नगरसेवक गैरहजर राहिले. निवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठी सेना-भाजपाने उमेदवार उभे केले होते. (प्रतिनिधी)