‘महालक्ष्मी की अंबाबाई’चे प्रकाशन--‘लोकमत’चे अभिनंदन

By Admin | Updated: September 26, 2014 23:25 IST2014-09-26T21:19:35+5:302014-09-26T23:25:04+5:30

सुभाष देसाई : शिवपत्नीला विष्णुपत्नी बनवण्याचे कारस्थान--कॅलेंडरमुळे प्रसार

'Mahalaxmi Ki Ambabai' - Publication of 'Lokmat' | ‘महालक्ष्मी की अंबाबाई’चे प्रकाशन--‘लोकमत’चे अभिनंदन

‘महालक्ष्मी की अंबाबाई’चे प्रकाशन--‘लोकमत’चे अभिनंदन

कोल्हापूर : मी देशभरातील शक्तिपीठांना जाऊन आलो आहे. अगदी उज्जैनमध्ये असलेल्या शक्तिपीठांच्या नोंदीत कोल्हापूरच्या ‘अंबाबाई’चा उल्लेख आहे. अंबाबाई ही सिंहवाहिनी आहे. तिच्या हातात ढाल आणि गदा आहे. श्रीयंत्र हे शक्तिपीठाचाच एक भाग आहे. मात्र, देवस्थानच्या गलथान कारभारानंतर शिवपत्नीला विष्णुपत्नी करण्याचे कारस्थान केले गेले. या देवीचा खरा इतिहास पुन्हा उजेडात आणण्यासाठी लोकचळवळ उभारली पाहिजे, असे आवाहन डॉ. सुभाष देसाई यांनी केले.
शेकापच्या कार्यालयात ‘महालक्ष्मी की अंबाबाई : एक सत्यशोधन’ या पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजीराव कदम होते. यावेळी सुनीलकुमार सरनाईक, भानुदास यादव महाराज, बाबूराव कदम, विलास झुंजार उपस्थित होते.
डॉ. देसाई म्हणाले, कोल्हापूरचे स्थान शक्तिपीठ आहे. बालाजीची पत्नी या चुकीच्या प्रचाराने शक्तिपीठ असलेल्या या स्थानाचे महत्त्व कमी झाले आहे. त्याला देवस्थानचा कारभार जबाबदार आह. श्रीपूजकांनी केवळ उत्पन्नाचा विचार केला
सुनीलकुमार सरनाईक म्हणाले, आम्ही बालपणी अंबाबाई मंदिरात खेळलो, वाढलो. देवीला सगळे ‘महालक्ष्मी’ म्हणून नाही, तर ‘अंबाबाई’ असे संबोधतात. ‘करू या उदो उदो अंबाबाईचा’, ‘मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा’ अशी गाणी प्रसिद्ध आहेत. फक्त स्वार्थासाठी या मंदिराचा इतिहास बदलला जात आहे. स्वार्थासाठी भाकडकथा रचल्या गेल्या आणि पैशांच्या दृष्टिकोनातून चुकीचे मार्के टिंग केले जात आहे. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

‘लोकमत’चे अभिनंदन
या कार्यक्रमात ‘लोकमत’ने अंबाबाईचा खरा इतिहास प्रकाशात आणल्याबद्दल ‘लोकमत’चे अभिनंदन केले. यापुढे कोल्हापूरकरांनी दुर्गेचा विष्णुपत्नी म्हणून होणारा प्रसार थांबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मत व्यक्त करण्यात आले.

कॅलेंडरमुळे प्रसार
देसाई म्हणाले, शिर्के यांनी ‘महालक्ष्मी’ नावाचे कॅलेंडर काढले. त्यावर कोल्हापूरच्या अंबाबाईचा फोटो लावला. त्यामुळे कोल्हापूरच्या अंबाबाईचा ‘महालक्ष्मी’ असा प्रसार झाला.

Web Title: 'Mahalaxmi Ki Ambabai' - Publication of 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.