महादेव जानकरांना बडतर्फ करा
By Admin | Updated: October 12, 2016 19:52 IST2016-10-12T17:32:26+5:302016-10-12T19:52:41+5:30
पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना बडतर्फ करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लावून धरली

महादेव जानकरांना बडतर्फ करा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - एमएलसी म्हणजे मुख्यमंत्र्यांचा लॉयल चमचा, असा उल्लेख करत महादेव जानकरांनी विधान परिषद, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांचा अपमान केल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला आहे. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना बडतर्फ करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लावून धरली असून, यासंदर्भात राज्यपालांना पत्र लिहिणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान काल दसरा मेळाव्याला भगवानगडावर केलेल्या भाषणात महादेव जानकर यांनी अजित पवारांवर अश्लाघ्य भाषेत टीका केली होती. "बारामतीची सुपारी घेणाऱ्यांची वाट लावणार आहे. बारामतीचं वाटोळे केल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी जोरदार टीका जानकरांनी अजित पवारांवर केली आहे. त्यामुळे आक्रमक झालेले राष्ट्रवादीचे कार्यकर्त्या राज्यभर विविध ठिकाणी जानकरांविरोधात आंदोलन करत आहेत.
रासपा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारीच्या घटनाही समोर आल्या आहेत. या सर्व प्रकरणावर जानकरांनी 3 दिवसांनी बोलणार असल्याचं सांगितलं आहे. मी सध्या अज्ञातवासात आहेत, असंही ते एका वृत्तवाहिनीला म्हणाले आहेत.