शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांसोबत भेट झाल्याची चर्चा; पण जानकरांनी दिली वेगळीच माहिती, मविआबद्दल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 18:14 IST

जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आज महादेव जानकर यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले होते.

Mahadev Jankar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्यास अवघे काही तास बाकी असल्याने जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.  महाविकास आघाडीला ताकद देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून नवे मित्रपक्ष सोडण्याचाही प्रयत्न होत आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे मागील काही दिवसांपासून शरद पवार यांच्या संपर्कात आहे. अशातच जागांचा तिढा सोडवण्यासाठी आज महादेव जानकर यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र स्वत: महादेव जानकर यांनी हे वृत्त फेटाळत आज मी शरद पवार यांची भेट घेतली नसल्याचं म्हटलं आहे.

शरद पवारांच्या भेटीबाबतच्या चर्चांवर बोलताना महादेव जानकर म्हणाले की, "माझी आज शरद पवारांसोबत भेट झालेली नाही. तुम्हाला चुकीची माहिती मिळाली आहे. मी तिथं एका संपादकांना भेटण्यासाठी गेलो होतो. शरद पवार साहेबांनी मला माढ्याची जागा देऊ केली आहे. मात्र मी माढा आणि परभणी या दोन जागांसाठी आग्रही आहे. परभणीच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. रासपला ही जागाही हवी आहे. महाविकास आघाडीने अद्याप आम्हाला चर्चेला किंवा बैठकीला बोलावलेलं नाही," अशी माहिती जानकर यांनी दिली आहे.

कसं आहे माढा मतदारसंघाचं गणित?

माढा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील फलटण, माण हे दोन तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस आणि सांगोला हे चार विधानसभा मतदारसंघ येतात. मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर २००९ मध्ये पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी विजय मिळवला होता. त्यांनी सुमारे ३ लाखांचे मताधिक्य घेतले होते. त्यानंतर २०१४ मध्ये राष्ट्रवादी पक्षाचाच उमेदवार विजयी झाला. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे खासदार झाले. पण त्यांना केवळ काठावरचे मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी महायुतीतील सदाभाऊ खोत यांनी निकराची झुंज दिली होती. 

दरम्यान, २०१९च्या निवडणुकीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांचा सुमारे ८५ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. महायुतीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या अजित पवार गटाकडून माढा मतदारसंघाची जागा मिळावी, अशी मागणी होत होती. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी बंधू संजीवराजे नाईक- निंबाळकर यांच्यासाठी ही जागा मागितली होती. मात्र भाजपकडून नुकतीच पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४