महाड दुर्घटना - मॅग्नेट सर्च ऑपरेशन मध्ये 'या' क्रेनचा वापर
By Admin | Updated: August 4, 2016 13:26 IST2016-08-04T13:23:40+5:302016-08-04T13:26:08+5:30
सावित्री नदीतील एनडीआऱएफच्या मॅग्नेट सर्च ऑपरेशन मध्ये एसटी बसचे अवशेष निष्पन्न होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाड दुर्घटना - मॅग्नेट सर्च ऑपरेशन मध्ये 'या' क्रेनचा वापर
ऑनलाइन लोकमत
महाड, दि. ४ - सावित्री नदीतील एनडीआऱएफच्या मॅग्नेट सर्च ऑपरेशन मध्ये एसटी बसचे अवशेष निष्पन्न होण्याची शक्यता निर्माण झाली असून, लोहचुंबकास चिकटलेले ते अवजड अवशेष नदिच्या पूराच्या पाण्या बाहेर काढण्याकरीता महाकाय क्रेन राजेवाडी येथे पाचारण करण्यात आली आहे.
निष्पन्न होत असलेले अवशेष एसटी बसचे आहेत वा अन्य या बाबत सध्या खातरजमा करण्यात येत असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे. राजेवाडी येथे बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी नदी किनारी केली आहे.