महाड दुर्घटना : 19 मृतांच्या वारसांना मदत

By Admin | Updated: August 9, 2016 21:43 IST2016-08-09T21:43:28+5:302016-08-09T21:43:28+5:30

महाड दुर्घटनेत एकूण 26 मृतदेह आतापर्यंत हाती आले असून त्यापैकी 19 जणांची वारस कागदपत्रे छाननी पूर्ण झाली आहे. त्यांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या शासकीय मदतीचे प्रत्येकी

Mahad Accident: 19 help to the deceased's henchmen | महाड दुर्घटना : 19 मृतांच्या वारसांना मदत

महाड दुर्घटना : 19 मृतांच्या वारसांना मदत

ऑनलाइन लोकमत

अलिबाग दि.09 - महाड दुर्घटनेत एकूण 26 मृतदेह आतापर्यंत हाती आले असून त्यापैकी 19 जणांची वारस कागदपत्रे छाननी पूर्ण झाली आहे. त्यांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या शासकीय मदतीचे प्रत्येकी 4 लाख रुपयांचे धनादेश संबंधित तालुक्याच्या तहसिलदार यांच्याकडे पाठविण्यात आले असून ते  संबंधितांच्या वारसांना देण्यात येत आहेत. उर्वरित 7 जणांच्या संदर्भातही कार्यवाही सुरु आहे. लवकरच ती पूर्ण होईल. अशी माहिती महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती सुषमा सातपुते यांनी दिली.

           या दुर्घटनेतील मृत स्नेहल व सुनिल बैकर, अनिश बेलेकर, यांच्या वारसांना रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी धनादेश देऊन त्यांचे सांत्वन केले अजय सिताराम गुरव यांच्या वारसांना राजापूर तहसिलदार सचिन भालेराव यांनी तर प्रशांत माने यांच्या वारसांस अंधेरीचे महसूल नायब तहसिदार श्री.हलाले तसेच श्रीमती भूमी भूषण पाटेकर उर्फ दिपाली बेलेकर यांच्या वारसांना वैभववाडी तहसिलदार संतोष जाधव यांनी धनादेश दिले.

Web Title: Mahad Accident: 19 help to the deceased's henchmen