महाबीजचे एमडी बकोरियांची औरंगाबादला बदली
By Admin | Updated: May 18, 2017 20:00 IST2017-05-18T19:03:24+5:302017-05-18T20:00:00+5:30
महावितरणच्या प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार घेणार

महाबीजचे एमडी बकोरियांची औरंगाबादला बदली
ऑनलाइन लोकमत
अकोला : औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त असताना वर्षभरातच बदली झालेले ओम प्रकाश बकोरिया यांची दोन आठवड्यातच पुन्हा अकोला येथून औरंगाबाद येथे महावितरणच्या प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. दोन आठवड्यापूर्वी औरंगाबाद येथून त्यांची अकोला येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे (महाबीज) व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली होती. बदली झाल्यानंतर त्यांनी २ मे रोजी अकोला येथे येऊन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला होता.
बकोरिया यांनी बदलीला दुजोरा दिला आहे. येथून औरंगाबादला जाण्यापूर्वी सोमवारी ते महाबीज अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे वृत्त आहे.