महाबळेश्वरला पावसाने झोडपले
By Admin | Updated: June 23, 2015 02:27 IST2015-06-23T02:27:15+5:302015-06-23T02:27:15+5:30
राज्यात मॉन्सून सक्रीय आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वदूर पाऊस पडत आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत तुफान पाऊस पडला.

महाबळेश्वरला पावसाने झोडपले
पुणे : राज्यात मॉन्सून सक्रीय आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वदूर पाऊस पडत आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत तुफान पाऊस पडला. तेथील वेधशाळेत ३७० मिमी पावसाची नोंद झाली. कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यात पावसाने तुरळक हजेरी लावली.
महाबळेश्वरपाठोपाठ गेल्या २४ तासांत कोकणातील खेडमध्ये २६० मिमी, महाडमध्ये २४०, चिपळूणमध्ये २३०, तर घाटमाथ्यांवरही मुसळधार सुरू असून कोयना घाटात २७०, शिरगाव घाटात २४०, ताम्हिणी २२०, अम्बोणे १९० मिमी पाऊस झाला.