बच्चेकंपनी किल्ले बनविण्यात मग्न

By Admin | Updated: October 26, 2016 17:56 IST2016-10-26T17:56:46+5:302016-10-26T17:56:46+5:30

दिवाळीत विविध गोष्टी बनविण्यात तरूणांपासून थोरांपर्यंत गृहीणी देखील मग्न असतात. याच काळात बच्चे कंपनी तरी कशी मागे राहिल.

Magnitudes build children's forts | बच्चेकंपनी किल्ले बनविण्यात मग्न

बच्चेकंपनी किल्ले बनविण्यात मग्न

ऑनलाइन लोकमत  

ठाणे, दि. 26 - दिवाळीत विविध गोष्टी बनविण्यात तरूणांपासून थोरांपर्यंत गृहीणी देखील मग्न असतात. याच काळात बच्चे कंपनी तरी कशी मागे राहिल. सध्या दिवाळीसाठी टिटवाळा येथील बच्चेकंपनी किल्ले बनविण्यासाठी मग्न असल्याचे चित्र पहावयास मिळते. 

नुकत्याच शाळा काॅलेजच्या सहामाही परिक्षा संपल्या असून दिवाळी अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निमित्ताने नागरिक घराची साफसफाई  व रंगरंगोटी करण्यात व्यस्त तर कुणी दिवाळी आकाश कंदील व लायटिंग लावण्यात व्यस्त दिसून येत  आहेत. महिला वर्गाची देखील दिवाळीचा फराळ बनविण्याची लगबग पहावयास मिळते आहे. याच काळात नुकतीच शाळेला सुट्टी लागलेली बच्चे कंपनी देखील कशी मागे रहाणार. ते पण  आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले बनविण्यात मग्न झाले असल्याचे चित्र टिटवाळा शहरात पहावयास मिळते. 

 

Web Title: Magnitudes build children's forts