मालाडमध्ये इमारतीला भीषण आग
By Admin | Updated: May 23, 2017 22:14 IST2017-05-23T22:14:49+5:302017-05-23T22:14:49+5:30
मुंबईतील मालाड पश्चिममधील चावडा कमर्शियल इमारतीमध्ये असलेल्या एका गाळ्यात भीषण आग लागल्याचे वृत्त आहे.

मालाडमध्ये इमारतीला भीषण आग
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - मुंबईतील मालाड पश्चिममधील चावडा कमर्शियल इमारतीमध्ये असलेल्या एका गाळ्यात भीषण आग लागल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालाडमधील एव्हरशाईन मॉलच्या मागे असलेल्या विजय इंडस्ट्रीयल इस्टेट येथील चावडा कमर्शियल इमारतीमधील एका गाळ्याला आग लागली असून आग विझविण्यासाठी घटनास्थळी अग्नीशमन दल्याच्या आठ गाड्या दाखल झाल्या आहेत. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशमन दलाच्या जवानांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच, अद्याप या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे अग्नीशमन दलाकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.