शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

Magnetic Maharashtra : प्रिंट मीडिया भविष्यातही प्रभावी राहील; 'लोकमत'च्या ऋषी दर्डा यांचा ठाम विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 19:37 IST

आज सगळेच जण डिजिटलबद्दल बोलतात. प्रत्येक उद्योगात डिजिटल जोरात आहे. बातम्यांचं जगही त्याला अपवाद नाही. पण वर्तमानपत्रं, अर्थात प्रिंट मीडियाही यापुढच्या काळात तितकाच प्रभावी राहील, असा विश्वास लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी आज व्यक्त केला.

मुंबई - आज सगळेच जण डिजिटलबद्दल बोलतात. प्रत्येक उद्योगात डिजिटल जोरात आहे. बातम्यांचं जगही त्याला अपवाद नाही. पण वर्तमानपत्रं, अर्थात प्रिंट मीडियाही यापुढच्या काळात तितकाच प्रभावी राहील, असा विश्वास लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी आज व्यक्त केला. मॅग्नेटिक महाराष्ट्र समिटमध्ये 'मीडियाः शेपिंग द फ्युचर ऑफ इन्फॉर्मेशन अँड एन्टरटेन्मेंट' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

पाच वर्षांपूर्वी ट्रेनच्या एखाद्या डब्यात १०० जण पेपर वाचताना दिसायचे. आज ही संख्या २० वर आली आहे. वृत्तपत्रांची जागा स्मार्टफोनने घेतलीय, पण वृत्तपत्रांवरचा विश्वास जराही कमी झालेला नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. कमी किंमत आणि सोयीस्करपणे - अगदी घराच्या दारात उपलब्ध होत असल्यानं  वृत्तपत्रं जनतेच्या मनात घर करून आहे. त्यामुळे या माध्यमाबाबत लोकमत सकारात्मक असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

या चर्चासत्रात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, दिग्दर्शक रितेश सिधवानी, व्हायकॉम 18चे ग्रूप सीईओ सुधांशू वत्स, रिपब्लिक टीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक अर्णब गोस्वामी आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे कन्टेंट हेड विजय सुब्रमण्यम सहभागी झाले होते. हे सगळ्यांचा भर डिजिटल मीडियावर असताना, ऋषी दर्डा यांनी वर्तमानपत्रांची - प्रिंट मीडियाची ताकद वर्णन केली. लोकमतचे ३०० वार्ताहर महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातील बातम्या देण्यासाठी सज्ज आहेत आणि त्या वाचकांनाही हव्यात, असं त्यांनी आवर्जून सांगितलं.

प्रिंट मीडियासोबतच इंटरनेट, डिजिटल मीडियाबाबतही लोकमत समूह जागरूक आहे आणि त्यातही चांगली गुंतवणूक करत असल्याचं ऋषी दर्डा म्हणाले. पुढच्या चार ते पाच वर्षांत ग्रामीण भागात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या शहरी इंटरनेट यूजर्सपेक्षा जास्त असेल. हे लक्षात घेऊन डिजिटल कन्टेंट आणि व्हिडिओवरही लक्ष केंद्रीत केल्याचं त्यांनी सांगितलं.   

दरम्यान, चित्रपट (बॉलिवूड), टीव्ही, वेब, वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी एकत्र येऊन महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने राज्यात 'मीडिया हब' तयार करणं गरजेचं असल्याचं मत शाहरुख खाननं या चर्चासत्रात मांडलं. मीडिया हे क्षेत्र वेगाने वाढत असून त्यातून रोजगाराच्या मोठ्या संधीही निर्माण होत आहेत. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याची ताकद मीडियामध्ये असल्याचा विश्वास सर्वच वक्त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Magnetic Maharashtraमॅग्नेटिक महाराष्ट्रRishi Dardaऋषी दर्डाbusinessव्यवसायMediaमाध्यमे