शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

Narmada River ST Bus Accident: एसटी बस नदीच्या पाण्यात नाही, खांबाच्या चौथऱ्यावर कोसळली; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 13:36 IST

ST Bus Accident in Madhya Pradesh side story: मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट येथे हा अपघात घडला. संजय सेतू पुलावर समोरून राँग साईडने वाहन येत होते, या वाहनाशी टक्कर टाळण्य़ासाठी एसटी चालकाने प्रयत्न केला.

सकाळी दहाच्या सुमारास महाराष्ट्राची एसटी बस मध्य प्रदेशमधील नर्मदा नदीवरील पुलावरून खोल नदीपात्रात कोसळली. यामध्ये आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पाच मृतदेहांची ओळख पटल्याचे सांगितले जात आहे. यापैकी तिघे जळगावचे तर दोन राजस्थानचे आहेत. 

Narmada River ST Bus Accident: एसटी बस अपघात: आठ जणांची ओळख पटली; मृतांपैकी पाच जण महाराष्ट्रातील

एसटी बसमधून सुमारे ५० ते ५५ प्रवासी प्रवास करत होते. यापैकी १५ जणांना वाचविण्यात यश आले आहे. उर्वरित प्रवाशांचा शोध सुरु असून क्रेनने बस नदीपात्राबाहेर काढण्यात आली आहे. एसटी प्रशासनाने हेल्पलाईन नंबर जारी केला असून 022-23023940 असा हा क्रमांक आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. जखमींना आवश्यक वैद्यकीय मदत, मृतांची ओळख पटविण्याचे काम करण्यात येत असल्याचे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे. 

 मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट येथे हा अपघात घडला. संजय सेतू पुलावर समोरून राँग साईडने वाहन येत होते, या वाहनाशी टक्कर टाळण्य़ासाठी एसटी चालकाने प्रयत्न केला. यावेळी नियंत्रण सुटल्याने कठडा तोडून ही बस २५ फूट खोल नदीपात्रात कोसळली. या बसमध्ये १३ मुले असल्याचे सांगितले जात आहे. काही मृतांची ओळख पटली असली तरी त्यांची नावे अद्याप समजलेली नाहीत. 

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितले...बस पाण्यात पडताच काही प्रवाशांनी पोहून पुलाच्या खांबांचा आधार घेतला व जीव वाचविला. यापैकी ५ ते ७ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. बस खाली कोसळली ती थेट पाण्यात न कोसळता खांबाच्या चौथऱ्यावर कोसळली त्यानंतर ती पाण्यात पलटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. यावेळी ज्यांना पोहायला येत होते, ते बसबाहेर पडले आणि त्यांनी खांबाच्या चौथऱ्याचा आधार घेतला. काहींना वाचविण्याचाही प्रयत्न केला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  

टॅग्स :state transportएसटीMadhya Pradeshमध्य प्रदेशAccidentअपघात