कणकवली नगराध्यक्षपदी माधुरी गायकवाड
By Admin | Updated: October 9, 2015 02:15 IST2015-10-09T02:15:35+5:302015-10-09T02:15:35+5:30
कणकवली नगराध्यक्षपदाची निवडणूक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि युवा नेते संदेश पारकर यांच्यातच झाली. यात संदेश पारकर यांनी बाजी मारत नारायण राणे गटाला धक्का दिला आहे.
कणकवली नगराध्यक्षपदी माधुरी गायकवाड
कणकवली : कणकवली नगराध्यक्षपदाची निवडणूक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि युवा नेते संदेश पारकर यांच्यातच झाली. यात संदेश पारकर यांनी बाजी मारत नारायण राणे गटाला धक्का दिला आहे. पारकर गटाच्या माधुरी गायकवाड नगराध्यक्षपदी निवड झाली.
मावळत्या नगराध्यक्ष अॅड. प्रज्ञा खोत यांनी आपले निर्णायक मत पारकर गटाच्या माधुरी गायकवाड यांच्या पारड्यात टाकल्याने राणे गटाच्या सुविधा साटम यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. पारकर गटाच्याच कन्हैया पारकर यांची निवड झाली. (वार्ताहर)
संदेश पारकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना राणे विरूद्ध पारकर यांच्यात वेळोवेळी टक्कर व्हायची. मात्र, दोन वर्षांपूर्वी आमदार नीतेश राणे यांच्या पुढाकाराने संदेश पारकर यांनी नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राणे यांनी जुने सर्व राजकीय वैर विसरून त्यांची कोकण सिंचन महामंडळाच्या उपाध्यक्षपदी वर्णीही लावली होती.
गद्दारी रक्तात असली की कृतीत येते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही निवडणूक, असो. नियती, नियम व न्यायालय अस्तित्वात आहेत. गद्दारांना अद्दल घडेल. हुरळून जाऊ नका.
- नारायण राणे