माधुरी दीक्षित मराठी रंगभूमीवर
By Admin | Updated: June 26, 2014 23:49 IST2014-06-26T23:49:58+5:302014-06-26T23:49:58+5:30
मराठी चित्रपटात आज ना उद्या माधुरी दीक्षित दिसेल, ही अपेक्षा अजून मूर्त स्वरूपात आली नसताना मराठी नाटकाची तर बात कोसो दूरच! पण त्या दिवशी मात्र माधुरीचे चक्क मराठी रंगभूमीवर दर्शन झाले.

माधुरी दीक्षित मराठी रंगभूमीवर
>राज चिंचणकर - मुंबई
मराठी चित्रपटात आज ना उद्या माधुरी दीक्षित दिसेल, ही अपेक्षा अजून मूर्त स्वरूपात आली नसताना मराठी नाटकाची तर बात कोसो दूरच! पण त्या दिवशी मात्र माधुरीचे चक्क मराठी रंगभूमीवर दर्शन झाले.
मराठी रंगभूमीवर माधुरी अवतरली खरी; पण याचा अर्थ माधुरी एखाद्या मराठी नाटकात काम वगैरे करणार आहे अशातला काही भाग नाही. ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ या मराठी नाटकाच्या 1क्क् व्या प्रयोगाच्या निमित्ताने माधुरी रंगभूमीवर आली होती. मात्र या नाटकाच्या शतक महोत्सवी प्रयोगावेळी माधुरीचे दर्शन थेट मराठी रंगभूमीवर झाल्याने काही क्षण अनेकांना स्वप्न सत्यात उतरल्याचा भास झाला.
‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’च्या या प्रयोगाला माधुरीला खास निमंत्रण होते. त्याप्रमाणो ती प्रयोगाला आली. या नाटकाचा आस्वाद तर तिने घेतलाच, शिवाय नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
‘अलिबाबा..’चा हा प्रयोग सुरेखच आहे. या नाटकाची थीम खूपच वेगळी आहे. लोकांना हसवणो हे कठीण असते, पण या नाटकाने ते साध्य केले आहे. एकाच सेटवर नऊ लोकेशन्स निर्माण करण्याचे काम नेपथ्यकाराने केले असून ते वैशिष्टय़पूर्ण आहे. मराठी रंगभूमीवरील लोक खूप मेहनत घेतात. त्यामुळेच अशा प्रकारची उत्तम नाटके मराठीत सादर होतात, असे सांगत मराठी रंगभूमीवर येऊन, तुम्हा सर्वांना भेटून खरंच खूप आनंद होतोय, अशा भावनाही माधुरीने व्यक्त केल्या.
या नाटकाचे दिग्दर्शक अजित
भुरे म्हणाले की, केवळ नाटय़रसिक आणि कलावंतांमुळेच आम्ही 1क्क्व्या प्रयोगापर्यंत मजल मारू शकलो. आनंद इंगळे, राजन भिसे,
सीमा देशमुख, धनंजय गोरे, विद्याधर जोशी, मंजूषा गोडसे, राधिका विद्यासागर अशा या नाटकातल्या कलावंतांसह या वेळी माधुरी रंगभूमीवर रंगली.