कामोठे पोलीस ठाण्यात माथेफिरूचा धुडगूस

By Admin | Updated: October 17, 2016 02:31 IST2016-10-17T02:31:03+5:302016-10-17T02:31:03+5:30

कामोठे पोलीस ठाण्यात आणलेल्या माथेफिरूने कामोठे पोलीस ठाण्यातील सामानाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

Madhefiru fog in Kamothe police station | कामोठे पोलीस ठाण्यात माथेफिरूचा धुडगूस

कामोठे पोलीस ठाण्यात माथेफिरूचा धुडगूस


कळंबोली : कामोठे पोलीस ठाण्यात आणलेल्या माथेफिरूने कामोठे पोलीस ठाण्यातील सामानाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.
आनंद सरगर (३२) कामोठे येथील रहिवासी असून सेक्टर २१ मध्ये कुटुंबासोबत राहतो. शनिवारी सकाळी घरात किरकोळ वादावादी करून सरगर घराबाहेर पडला. घराबाहेर पडल्यानंतर रस्त्यावरील दगड फेकून त्याने पादचाऱ्यांना मारहाण केली. याशिवाय परिसरातील कामोठे पोलीस ठाण्यातील गाड्यांवर तसेच इमारतीवरही दगडफेक केली. हा प्रकार पोलीस ठाणे येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सरगर यास पोलीस ठाण्यात पकडून आणले. त्यावेळी त्याने पोलीस ठाण्याबाहेर ठेवलेल्या कुंड्यांची तोडफोड केली. पोलीस ठाण्यात घेऊन गेले असता खुर्च्या, कपाटाच्या काचाही फोडल्या. टेबलावरील कागदपत्रे अस्ताव्यस्त केली. त्यामुळे त्यास रस्सीने बांधून ठेवण्यात आले होते.
यासंदर्भात सरगरच्या नातेवाइकांनाही कळवण्यात आले. तेव्हा त्याला वारंवार असे झटके येत असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांना दिली. त्यामुळे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद केला नाही. (वार्ताहर)

Web Title: Madhefiru fog in Kamothe police station