खोपोलीत जाळला माधव भंडारींचा पुतळा

By Admin | Updated: June 29, 2016 02:29 IST2016-06-29T02:29:22+5:302016-06-29T02:29:22+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत आपत्तीजनक विधान केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत.

Madhav Bhandari statue burnt in the Khopoliite | खोपोलीत जाळला माधव भंडारींचा पुतळा

खोपोलीत जाळला माधव भंडारींचा पुतळा


वावोशी : भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत आपत्तीजनक विधान केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत. खोपोलीतही मंगळवारी दुपारी दीपक चौकात शिवसैनिकांकडून माधव भंडारी यांचा पुतळा जाळण्यात आला.
राज्यात व केंद्रात शिवसेना- भाजपा सरकार एकत्र चालवत असले तरी या दोन पक्षांत सध्या भडका उडालेला दिसत आहे. शिवसेना पक्षाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्र मात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी महापालिका व नगरपालिका निवडणुकीसाठी वेडीवाकडी युती करणार नाही असे नाव न घेता भाजपाला टोला लगावला होता. त्यानंतर भाजपाकडून अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. मात्र भाजपाचे काही नेते, प्रवक्ते मात्र सेना व उद्धव ठाकरेंबाबत काही तरी बोलताना दिसत होते. या दोन्ही पक्षांत आरोप-प्रत्यारोपाची मालिकाच सुरू झाली व नुकतीच भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना शोले पिक्चरमधील असरानीशी केल्यानंतर शिवसैनिक भडकले आणि महाराष्ट्रात तांडव सुरू झाले. पुणे, मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये शिवसैनिकांकडून माधव भंडारी यांचा निषेध वेगवेगळ्या मार्गाने सुरू झाला.
खोपोलीत मंगळवारीही शिवसैनिकांनी कोणालाही कल्पना न देता माधव भंडारी यांचा पुतळा जाळत निषेध नोंदवला. काही शिवसैनिक शहराच्या दीपक चौकात जमले आणि त्यांनी माधव भंडारी यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. यावेळी अचानक झालेल्या या आंदोलनाची माहिती पोलिसांना आयत्यावेळी लागली. दीपक चौकात पोलीस पोहचले व त्यांनी भंडारींचा पुतळा विझवण्याचा प्रयत्न केला व शिवसैनिकांची धरपकड केली. या आंदोलनासाठी परवानगी न घेतल्याने शहर संपर्क प्रमुख विवेक पाटील, गटप्रमुख अनिल सानप, अनिल शेलार, नितीन मोरे, वसंत जोशी, बाळासाहेब धामणकर यांना पोलिसांनी अटक केली व गुन्हा नोंदवण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Madhav Bhandari statue burnt in the Khopoliite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.