औरंगाबादजवळ लक्झरी बसला आग, चालकाच्या प्रसंगावधानाने सर्व प्रवासी सुखरुप

By Admin | Updated: May 14, 2016 14:10 IST2016-05-14T07:52:46+5:302016-05-14T14:10:44+5:30

शॉर्ट सर्किट झाल्याने बुलडाणा मुंबई लक्झरी बसला शनिवारी सकाळी औरंगाबादजवळ भीषण आग लागली.

Luxury bus near Aurangabad fire | औरंगाबादजवळ लक्झरी बसला आग, चालकाच्या प्रसंगावधानाने सर्व प्रवासी सुखरुप

औरंगाबादजवळ लक्झरी बसला आग, चालकाच्या प्रसंगावधानाने सर्व प्रवासी सुखरुप

>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १४ - शॉर्ट सर्किट झाल्याने बुलडाणा मुंबई लक्झरी बसला शनिवारी सकाळी औरंगाबादजवळ भीषण आग लागली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत बस तत्काळ रस्त्याच्या कडेस उभी करत झोपेत असलेल्या सर्व प्रवाशांना खाली उतरवल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 
चाणक्य ट्रॅव्हल्सची मुंबई बुलडाणा या लक्झरी बसच्या (एमएच 29 - 7273) वायरिंगमध्ये काही बिघाड झाल्याने शॉर्ट सर्किट झाले व बसने पेट घेतला. पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याने सर्व प्रवासी झोपेत होते. मात्र बसमध्ये धूर झाल्याने आग लागल्याचे ड्रायव्हरला लक्षात आले व त्याने तत्काळ बस बाजूल थांबवली. आणि सर्व प्रवाशांना झोपेतून उठवून सुखरूपरित्या बसबाहेर काढले. 
 

Web Title: Luxury bus near Aurangabad fire